💥परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदासाठी झाले ९८.७३ टक्के मतदान...!


💥बँक निवडणूकीत १ हजार ५७३ पैकी १ हजार ५५३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला💥

परभणी (दि.२१ मार्च) - परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी आज रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी सकाळी ८-०० ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत १ हजार ५५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

परभणी येथील मतदान केंद्रावर सकाळी ८-०० ते ५-०० वाजेपर्यंत २६८ पैकी २६७ मतदारांनी मतदान केले. जिंतूरात १४० पैकी १३८ सेलूत ७२ पैकी ७२, पाथरीत ५४ पैकी ५३, मानवत ८४ पैकी ८३, सोनपेठात ५३ पैकी ५२, गंगाखेडात १३३ पैकी १३२, पालम १०३ पैकी १०१, पूर्णा १३८ पैकी १३८, हिंगोलीत १३२ पैकी १२९, सेनगाव १०२ पैकी ९४, औंढा नागनाथमध्ये ७७ पैकी ७७, वसमतमध्ये ११४ पैकी ११४ तर कळमनुरीत १०३ पैकी १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १ हजार ५७३ पैकी १ हजार ५५३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ९८.७३ इतकी होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या