💥परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीने केले उग्ररूप धारण; जिल्ह्यात आज शुक्रवारी आढळले २१५ कोरोनाबाधीत रुग्ण....!


💥जिल्ह्यात आजपर्यंत ३४७ कोरोनाबाधित रुग्णांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू💥

परभणी (दि.१९ मार्च) - परभणी जिल्ह्यात कोरोना महामारी हळुवारपणे उग्ररूप धारण करतांना पाहावयास मिळत असून प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत असतांनाही नागरिकांकडून प्रशासकीय निर्देशांचे पालन होत नसल्यामुळे सातत्याने कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असून शहरासह जिल्ह्यात आज शुक्रवार दि.१९ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६-०० वाजेपर्यंत तब्बल २१५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून रुग्णालयात औषधोपचार घेऊन बरे झालेल्या ६५ कोरोनामुक्तांना आज रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात ७४४ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर जिल्ह्यात आजपर्यंत ३४७ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार १५२ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ९ हजार ६१ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४७ हजार २१६ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३६ हजार ४८४ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार ९९९ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह,५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या