💥पालम तहसील मधील आढावा बैठकीत कामचुकार आधिकाऱ्याला आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी खडसावले...!


💥आढावा बैठकीत दुयम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचारावर चर्चा💥

पालम (दि.६ मार्च) - आज तहसील कार्यालय पालम येथे तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व विविध कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये कारणे दाखवून फायली लांबवू नका कामामध्ये  कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. कामे त्वरित करा असे म्हणून विविध कामाची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी झाडाझडती घेतली. तालुक्यात 142 विहिरी मंजूर केल्या असून, सिंचन विहिरी ला मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश लवकर देऊन शेतकऱ्यांची होत असलेली अडचण दूर करा असेही आमदार म्हणाले. तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांना वेठीस धरले धरले जात आहे अशा तक्रारी बैठकीत उपस्थित झाल्या. अशा तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत असेही अधिकाऱ्यांना खडसावून त्यांनी सांगितले. 20 गुंठ्याचा ही फेर लावा, फेरफार वेळेत लावा ,फेरफार साठी पैसे घेऊ नका, फेरफार बाबत  मीटिंग लवकर लावण्यात याव्यात , फेरफार लवकर होत नाहीत अशी तक्रार सतत वाढत आहे  याकडे उपस्थित नागरिकांनी  लक्ष वेधले असता  फेरफार बाबत मीटिंग घेऊन नव्याने आलेले अर्ज लवकर निकाली काढावेत असे आमदारांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा निधी वेळेवर मिळाला पाहिजे. उस जळालेल्या शेतकऱ्याला लवकर मदत करण्यात यावी. शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका असे ते म्हणाले .


परभणी येथील वीज वितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार ही या बैठकीत चव्हाट्यावर आला 200 ट्रांसफार्मर पडून आहेत, मनमानी करून शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ट्रांसफार्मर वेळीच दुरुस्त करून बसवून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन सुरळीत करा, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नका बिलाचे कारण सांगून शेतकऱ्यास वेटीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच नाबार्डच्या कर्ज योजना मधील शेतकरी व शेतमजूर यांना त्वरित कर्ज वितरण करा. जर बँक कर्ज वितरण त्वरित करत नसतील तर अशा बँका चालू देणार नाही असे ते म्हणाले.

 पालम शहरामध्ये कोणत्याही डिपार्टमेंटला निवास्थानाची सोय नाही या विषयावरही बैठकीमध्ये चर्चा झाली.

 पालम शहरासाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत 942 घरकुल व रमाई घरकुल योजनेअंतर्गत 139 घरकुल मंजूर झाले आहेत ,त्याचे काम चालू आहे घरकुल धारकाचे तातडीने पेमेंट करा ज्यांच्या घरकुलाचे काम अर्धेअधिक झालेले आहे अशा घरकुल धारकांची बिले वेळेवर काढा जेणेकरून त्यांना पुढचे काम करता येईल असे संबंधित अधिकाऱ्यांना आमदार गुटटे यांनी ठणकावून सांगितले .बरचसे घरकुल धारकांना रेती अभावी घरकुल बांधकामामध्ये अडथळे येत असून त्यांना रेती उपलब्ध करून द्या घरकुल बांधकामा शिवाय इतर कामासाठी रेती देऊ नका असे ते पुढे म्हणाले.

पालम ते ताडकळस कडे जाणाऱ्या रस्त्याचे त्या कामात होत असलेली कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही शहराच्या मधून रस्त्यावर वर दुतर्फा दुकाने असल्यामुळे व या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात धूळ होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असा प्रश्न बैठकीमध्ये नागरिकांनी  उपस्थित केला असता  संबंधित अधिकाऱ्यांनी यासाठी उपाय योजना कराव्यात अशी आमदारांनी सूचना केली.

 या बैठकीसाठी पालम च्या तहसीलदार प्रतिभाताई गोरे ,गटविकास अधिकारी  चकोर,पीडब्ल्यूडी चे अधिकारी, कृषी अधिकारी, नगरपंचायत चे मुख्याधिकारी,आरोग्य विभागाचे अधिकारी, वीज वितरण अधिकारी, महिला व बाल प्रकल्प अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बँकेचे अधिकारी, तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या