💥वाशिम जिल्हा पोलीस दलात गस्ती करीता ३० दुचाकी वाहनांचे आगमन...!


💥जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांचा जागतिक महिला दिनी कौतुकास्पद उपक्रम💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी यांनी वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्यानंतर नवनविन संकल्पनेच्या माध्यमातुन विविध कल्याणकारी, विविध समाजोपयोगी, कायदा व सुव्यवस्थेसंबंधी संकल्पनांची अंमलबजावणी केली. तसेच वेळोवेळी पोलीस ठाणे/शाखाना भेट देऊन पोलीस स्टेशन येथे आवश्यक साधन सामग्रीची विचारपुस करुन त्याची तातडीने पुर्तता करण्याकडे भर दिला जेणे करुन शासकीय कामे करतांना पोलीस अधिकारी/अंमलदार यांना अडचणी येणार नाहीत.त्याअनुषंगाने बऱ्याच दिवसापासुन पोलीस विभागाकरीता दिवसा व रात्री गस्ती करीता लागणाऱ्या मोटार सायकलची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक साहेब वाशिम यानी मा. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती वाशिम यांना नमुद बाबत प्रस्ताव पाठविला. पाठविलेल्या प्रस्तावाचा वेळोवेळी पाठपुरावा केल्याने मा. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती वाशिम यांचे पत्र क्र २५१/२०२१ दिनांक १४/०२/२०२१ अन्वये एकुण

१,६०,००,०००/- रुपये (एक कोटी साठ लाख रुपये) जिप,मोटार सायकल खरेदी करण्याकरीता मंजुर

करण्यात आले.GEM पोर्टल द्वारे खरेदी करण्यात आलेल्या एकुण ३०बिट मार्शल बाईक मा. पोलीस अधिक्षक वाशिम यांच्या आदेशाने आज दिनांक ०८/०३/२०२१ रोजी महिला दिनाचे औचित्य साधुन पोलीस

अधिक्षक कार्यालय आणण्यात आल्या.वाशिम जिल्हा पोलीस दलाचे वाहनांच्या ताफ्यामध्ये नव्याने प्राप्त झालेल्या मोटार सायकल हया

अतिशय वेगवान आहेत. गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार हे वायरलेस द्वारे प्राप्त कॉलला लवकरात

लवकर प्रतिसाद देऊन गरजु महिला/मुली अथवा जेष्ठ नागरिक किवा इतर गरजु व्यक्तीपर्यंत त्वरीत पोहचुन त्यांना तात्काळ मदत देण्यास उपयोगी होईल. मोटार सायकलवर बसविण्यात आलेल्या जिपीएस द्वारे नमुद वाहन कोणत्या ठिकाणी आहे याचे लोकेशन तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला/नियंत्रण कक्षास समजेल. त्यादृष्टीने कोणते वाहन कोणत्या गरजेच्या ठिकाणी विनाविलंब पाठविणे शक्य आहे हे सोईचे होईल. मा.पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पाडण्यात आला.तसेच जागतिक महिला दिनानिमित्त मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी यांच्या हस्ते वाशिम

पोलीस अधिक्षक कार्यालय येथील महिला अंमलदार यांना पुष्प गुच्छ देऊन जागतिक महिला दिनाच्या

शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधिक्षक श्री. वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. विजयकुमार चव्हाण,पोलीस उपअधिक्षक गृह श्री. श्रीराम घुगे, पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे

शाखा शिवाजी ठाकरे, राखीव पोलीस निरिक्षक क्षिरसागर,समस्त महिला वर्ग उपस्थित होते.


प्रतिनिधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या