💥शारीरिक आणि मानसिक ताणतणावांवर शांत झोप हेच औषध जागतिक निद्रा दिवसानिमित्त तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला...!


 💥आज १९ मार्च जागतिक निद्रा दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येत आहे💥 

पुणे (दि.१९ मार्च) : सर्व प्रकारचे शारीरिक आजार आणि मानसिक ताणतणावांवर मात करण्यासाठी शांत झोप हेच महत्त्वाचे औषध आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात आले आहे १९ मार्च जागतिक निद्रा दिवस म्हणून जगभर साजरा करण्यात येत आहे ‘शांत झोप म्हणजेच निरोगी भवितव्य’ हे यंदाच्या निद्रा दिवसाचे घोषवाक्य आहे. 

जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले,की चौरस आहार, योग्य व्यायाम आणि शांत झोप या बाबी निरोगी आयुष्यासाठी अनिवार्य आहेत योग्य वेळी म्हणजे रात्री शांत झोपणे हे चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे शरीराची दिवसभरात होणारी सर्व प्रकारची झीज भरुन काढणे दूषित द्रव्ये बाहेर काढणे अशी कामे शरीर झोपल्यानंतर होत असतात. 

शरीर आणि त्यातील प्रत्येक संस्था संपूर्ण कार्यक्षम राहण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे झोप चांगली नसेल तर अनेक आजार मागे लागतात, तसेच त्वचा, डोळे, मेंदू अशा सर्वांचे कार्य बिघडते त्यामुळे झोपेची शिस्त पाळणे महत्त्वाचे आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निकेत कासार म्हणाले,की मनाचे आरोग्य आणि शांत झोप यांचा नजीकचा संबंध आहे. 

झोपेचे गणित बिघडले तर चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे असे परिणाम दिसतात झोपेचे गणित दीर्घकाळ बिघडले तर त्या व्यक्तीला मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत का ? याचा शोध घ्यावा लागतो करोना महामारीच्या काळात कामाचे बदललेले स्वरूप, नोकरी-व्यवसाय जाणे, घरातून काम करण्यास सुरुवात केल्यामुळे वाढलेले कामाचे तास अशा अनेक कारणांमुळे झोप हा चिंतेचा विषय ठरला आहे झोपेचे प्रश्न घेऊन मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही वाढले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या