💥पुर्णेत अवैध चोरट्या वाळूची तस्करी करणाऱ्या वाळू तस्कराकडून टिप्पर पोलिसाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न...!


💥पूर्णा पोलिस स्थानकात चौघांच्या विरोधात गुन्हा💥

पुर्णा (दि.२६ मार्च) - पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून बिनधास्तपणे चोरट्या वाळूचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून त्या वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या वाळू तस्करांच्या मुजोरपणाचा प्रत्येय दस्तुरखुद्द पोलिस प्रशासनाच आल्याचे निदर्शनास येत असून अवैध चोरट्या वाळूची वाहतुक करणाऱे टिप्पर पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर घालण्याचा गंभीर प्रयत्न पुर्णेत काल गुरूवार दि.२५ मार्च २०२१ रोजी घडल्याने पोलिस प्रशासनही आता वाळू तस्करांच्या मग्रुरी विरोधात ॲक्शनमुड मध्ये आल्याचे दिसत आहे दरम्यान, पोलिस कर्मचार्‍यांना थांबवून ठेवत वाळूची चोरटी वाहतुक करणार्‍या टिप्परला मदत करण्यासह जीवे मारण्याच्या उद्देशाने टिप्पर अंगावर घालणे आदी तक्रारीवरून पूर्णा पोलिस स्थानकात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्णा शहरासह तालुक्यात पुर्णा-गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या चोरट्या वाळूचे उत्खनन करून या चोरट्या वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनांविरूध्द जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या आदेशाने फौजदार विश्वास खोले, कर्मचारी यशवंत वाघमारे,दिपक मुदीराज आदींना पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर येथून ग्बोबल रियाबल फॅक्ट्री (हड्डी कारखाना) येथे पूर्णा नदी पात्रातून वाळूचे अवैध उत्खणन करून वाळूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने एक टिप्पर येत असल्याची माहिती मिळाल्याने श्री. मुदीराज व वाघमारे हे रस्त्यावर गुरुवारी पहाटे एकच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी एमएच ०४ डीडी ३२७२ या टिप्परच्या चालकास हात दाखवून वाहन उभे करण्याचा इशारा केला. त्यावेळी चालकाने व टिप्पर मालक शेख बब्बर शेख बीबन याने त्यांच्या ताब्यातील टिप्पर भरधाव वेगाने चालवून जीवे मारण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस कर्मचार्‍यांनी तात्काळ सावधानता दाखवल्याने मोटरसायकल बाजूला फेकून दिली व ते खाली पडले. त्याचवेळी हड्डी कारखाना येथील सुलेमान व समद नामक व्यक्तींनी आम्हाला गेटवर थांबवून ठेवत टिप्पक कारखान्यामधून जाण्यास मदत केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करत टिप्पर पळून नेल्याप्रकरणी मुदीराज यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ हे करीत आहेत.

घटनेची माहिती समजताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड, पूर्णा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.पी. चोरमले यांनी घटनास्थळी धाव घेतली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या