💥परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया बाबत तात्काळ दखल घेण्याचे विधान परिषदेच्या सभापतींचे आदेश..!

💥राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी विधान परिषदेत आज गुरुवारी उपस्थित केला होता प्रश्न💥 

परभणी (दि.४ मार्च) - परभणी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात आज गुरूवार दि.४ मार्च २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी विधान परिषदेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता यावेळी विधान परिषदेच्या अध्यक्षांनी परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीबाबत राज्य सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यावा असे आदेश दिले आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज गुरुवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाव्दारे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा नामोल्लेख नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. गुणवत्तेस पात्र ठरलेल्या तसेच तीन शासकीय समित्यांनी शिफारस केलेल्या परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे या पध्दतीने पुर्णतः कानाडोळा करणे चुकीचे आहे, असे निदर्शनास आणून अन्य जिल्ह्यांप्रंमाणे परभणीतसुध्दा वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने मान्यता द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार दुर्राणी यांनी या मागण्यातून अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी व आसपासच्या अन्य जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याबाबत हे वैद्यकीय महाविद्यालय स्थापने अनिवार्य आहे, असेही स्पष्ट केले. कमीत कमी खर्चात हे महाविद्यालय तात्काळ कार्यान्वित होऊ शकते. सर्वार्थाने अनुकूलता असतानासुध्दा याबाबत होणारी दिरंगाई पूर्णतः आक्षेपार्ह आहे, असे म्हटले. सभापतींनी दुर्राणी यांच्या या मागणीची लगेच दखल घेतली. राज्यपालांच्या अभिभाषणात परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा टाळल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त करीत राज्य सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी, असे आदेश बजावले आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या