💥परभणी जिल्ह्यातील सेलु तालुक्यातल्या देवगाव फाटा येथे टिप्परला मोटरसायकलची धड़क लागल्याने तिघे गंभीर जखमी...!


💥याप्रकरणी महामार्ग पोलिसांनी घटनेची माहिती समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेत जख़्मीना रुग्णालयात दाखल केले💥

परभणी (दि.२० मार्च) : जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला एका भरघाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज शनिवार दि.२० मार्च २०२१ रोजी रात्री ८-३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद - जिंतूर  महामार्गावरील देवगाव फाटा जवळ घडली.

सेलू तालुक्यातील धामणगाव येथील अशोक गोरे,लक्ष्मण शिंदे व दादाराव मधुकर गोरे हे तिघे जण धामणगावकडे एका मोटरसायकलवरुन (एमएच २२ डब्लू ६७७४) जात होते. रस्त्यात उभे असलेले टिप्पर मोटरसायकल चालवणाऱ्यास दिसले नाही. मोटर सायकल टिप्परला धडकल्याने अपघात झाला. यात तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी महामार्ग पोलिसांनी घटनेची माहिती समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेत जख़्मीना रुग्णालयात दाखल केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या