💥औरंगाबाद जिल्ह्यात नाथषष्ठी निमित्त आयोजित होणाऱ्या पायी दिंड्यांना बंदी....!


💥पूजा व इतर विधी पारंपरिक पद्धतीने साजरे होणार💥

औरंगाबाद (दि.5 मार्च ) : कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या  नाथ षष्ठी निमित्त पायी दिंड्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले आहे.

पैठण येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात  नाथ षष्ठी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या  निमित्त   महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पायी दिंड्या जवळपास एक महिना अगोदर  पैठणकडे येण्यास  निघत असतात. पण सद्यस्थितीत सर्वत्र कोविड- 19 चा प्रादुर्भाव वाढत आहे तसेच दिवसेंदिवस कोविडच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असल्याने नाथ षष्ठी निमित्त वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही,  नाथ षष्ठी निमित्त होणारी विधिवत पूजा पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले .   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या