💥परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील जिंतूर-औंढा रस्त्यावरील पुंगळा जवळ झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार ठार...!


💥टेम्पोच्या जोरदार धडकेने मोटारसायकलवरील विजय जगताप वय वर्ष २३ रा.भोगाव हा तरूण जागेवरच ठार💥 

परभणी (दि.४ मार्च) जिल्ह्यातील जिंतूर येथील जिंतूर-औढा मार्गावरील पुंगळा जवळ भरधाव टेम्पोने एका मोटारसायकलस्वारास दिलेल्या भिषण धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दि.४ मार्च २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की जिंतूर शहरापासून पाच-सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पुंगळा गावाजवळील मंदार पेट्रोलपंपासमोर आज गुरुवारी एका भरधाव टेम्पोने समोरून जाणार्‍या मोटारसायकलला (क्र.एमएच २२-१९७९) पाठीमागून जोरदार धडक दिली. या जोरदार धडकेने मोटारसायकलवरील विजय जगताप वय वर्ष २३ रा.भोगाव हा तरूण जागेवरच ठार झाला. हा अपघात इतका भिषण होता की धडकेनंतर तरुण गाडीवरून उडाला व तो टेम्पोच्या चाकाखाली आल्याचे प्रत्यदर्शींनी म्हटले. या घटनेची माहिती मिळताच जिंतूर महामार्ग केंद्राचे फौजदार श्री राठोड, पोलीस कर्मचारी गजेंद्र फुगनर, श्री.जाधव, डोंबे, हरसुळकर आदींनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या