💥डोंगरगाव शिवारात वनवा पेटला,हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी...!


💥सखाराम बोबडे पडेगावकर यांनी अधिकाऱ्यांना माहिती कळवली💥

गंगाखेड (दि.२९ मार्च) - तालुक्यातील डोंगरगाव (शे) शिवारात सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली . सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सदर माहिती उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील यांना कलवत आग विझवण्या यासंदर्भात निर्देश द्यावेत अशी विनंती केली.


डोंगरगाव शिवारात गायरान जमिनीवरील डोंगरास आग लागल्याची माहिती सतीश गवळी त्यांना कळाली. गावातील युवक दत्ता रुपनर. कृष्णा सोपान सोन्नर. हनुमान सोन्नर. माऊली. वैजनाथ कांबळे. टोम्पे पंडित ,शिवराम भालेराव समाधान आदींनी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. पण ही आग आटोक्यात येत नसल्याचे कळताच गवळी यांनी ही माहिती सखाराम  बोबडे पडेडगावकर यांना कळवली. बोबडे यांनी वनविभागाचे अधिकारी कामाजी पवार ,सार्वजनिक वनीकरण विभागीय अधिकारी वाकचौरे, उपजिल्हाधिकारी सुधीर पाटील आदींना आगीची माहिती कळवत आग  वीझवण्यासाठी प्रशासनास पाठवावे अशी विनंती केली. वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग या दोन विभागात ही जमीन कोणा ची यावरून समन्वयाचा अभाव दिसून आला  . दोन -चार गावच्या सीमेवर असलेल्या या डोंगरावर भागातील हजारो जनावरे दरवर्षी चरण्यासाठी जातात. या आगीमुळे चार्‍याचा प्रश्न निर्माण होणार असून दुर्मिळ वनौषधीची झाडेही या आगीत भस्मसात झाली आहेत.अगोदरच चारा टंचाई असल्याने या भागातील शेळ्यामेंढ्या चालणारया मेंढपाला समोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या