💥पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेतून चक्क विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी गुरांचे खाद्य ?


💥महानगरपालिकेच्या शाळेत घडला मानवतेला काळीमा फासणारा हा अजब प्रकार💥

पुणे - भारतातील मध्यान्ह भोजनात वादाचा वाटा चांगलाच आहे आता पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेतून ही घटना उघडकीस आली असून तेथे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा भाग म्हणून जनावरांचे खाद्यपाठविण्यात आले महाराष्ट्रातील पुण्यात शाळा क्रमांक ५८ येथून ही भयावह बाब उघडकीस आली आहे सदर शाळा ही पुणे महानगरपालिका चालवते. 

भारतातील सर्वात श्रीमंत नागरी संस्थांपैकी एक असलेल्या महानगरपालिका या वर्षी १५ जानेवारीपर्यंत ३,२८५ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे देशव्यापी लॉकडाऊनमुळे सर्व शैक्षणिक संस्था बंद पडल्यामुळे महाराष्ट्रातील राज्य शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्य शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी मध्यान्ह भोजन पोहोचेल यासाठी स्थानिक अधिकारी कार्यरत करण्यात आले आहेत या आठवड्याच्या सुरुवातीस महानगरपालिका संचलित शालेय क्रमांक ५८ ला मध्यान्ह भोजन म्हणून वितरित करण्यात येणाऱ्या खाद्य सामग्रीचा एक साठा मिळाला शालेय अधिकाऱ्यांना लवकरच समजले की त्यांना मध्यान्ह भोजनाच्या नावाखाली गुराढोरांचा खाद्याचा पुरवठा केला गेला आहे.

 स्थानिक कार्यकर्त्यांनी या विषयावर प्रकाश टाकला, परिणामी भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.ए.आय.) च्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली एफ.एस.एस.ए.ए.आय.ने आता पुणे शाळेत पाठवलेला हा माल जप्त केला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या