💥मुंबईतील मालाड परिसरात ल्युडो खेळाच्या वादातून एकाचा खून.....!


💥याप्रकरणी आरोपी अमित राज पोपट वय ३४ याला पोलिसांनी अटक केली आहे💥 

मुंबई : ल्युडो खेळताना मित्र सतत जिंकत असल्याच्या रागातून त्याचा खून केल्याचा प्रकार मालाड परिसरात घडला याप्रकरणी आरोपी अमित राज पोपट वय ३४ याला पोलिसांनी अटक केली आहे तुकाराम नलवडे वय ५२ असे मृत व्यक्तीचे नाव आहे तुकाराम हे सुरक्षारक्षक होते तर आरोपी अमित हा वाहनचालक आहे हे दोघे मालाड येथील दारूवाला कंपाऊंड परिसरात वास्तव्याला होते तुकाराम आणि अमित हे  रात्री १०.३० च्या सुमारास पैसे लावून ल्युडो खेळत होते.


 खेळात तुकाराम सतत जिंकत असल्याचा अमितला राग आला त्यातून त्याने तुकाराम यांना मारहाण केली त्यात जखमी होऊन तुकाराम यांचा मृत्यू झाला दरम्यान तुकाराम यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते याबाबत तुकाराम यांच्या मुलीने २० तारखेला पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

 त्यानुसार मालाड पोलिसांनी आरोपी अमित याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय लिंगाडे यांनी दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या