💥युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने पुकारलेल्या संपामुळे बँकांचे कामकाज विस्कळीत....!


💥परभणी जिल्ह्यातील १०२ शाखेतील ४५० अधिकारी,कर्मचार्‍यांनी घेतला संपात सहभाग💥

परभणी (दि.१५ मार्च) - देशासह राज्यातील बँकांच्या खासगी करणाच्या विरोधात बँक अधिकारी कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात जिल्ह्यातील १०२ शाखेतील ४५० अधिकारी कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आहे असे डॉ.सतीश टाके, सचिव सुनील हट्टेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान सोमवार दि.१५ मार्च ते मंगळवार दि.१६ मार्च २०२१ या दोन दिवसाच्या संपाच्या कालावधीमध्ये बँकेच्या नेट बँकिंग,मोबाईल बँकिंग एटीएम सुविधा सुरळीत चालू राहतील,असेही त्यांनी म्हटले आहे.युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने आज १५ मार्च ते १६ मार्च २०२१ या दोन दिवसीय देशव्यापी संपाची घोषणा केली असून हा संप बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात पुकारण्यात आला असून आज सोमवारी या संपास सुरवात झाली. यामुळे बँकांचे कामकाज विस्कळित झाले.

शासनाच्या अविचारी व एककल्ली धोरणाचा विरोध करण्यासाठी हा संप पुकारला असल्याचे श्री. हट्टेकर यांनी म्हटले आहे. राष्ट्रीयकृत बँका ही आपली सर्वांची सामाईक संपत्ती आहे, ती टिकवून ठेवणे, तीत वृद्धी करणे ही आपली सर्वांची सामाईक जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खासकिकरणाच्या विरोधात हा देशव्यापी संप आहे. नफ्यात चाललेल्या, सर्वसामान्यांचा विश्वास असलेल्या बँका मूठभर भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट सरकार करत आहे. देशातील गोर गरीब जनतेला बँकिग सुविधा रास्त दारात उपलब्ध व्हाव्यात म्हणुन खासगी बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आणि मागील ५० वर्षाच्या काळात सरकारी बँका या खेडोपाडी पोहचल्या. स्वतःला मॅनेजमेंट गुरू म्हणून घेणार्‍या सरकारने बँकांतील काळानुरूप सुधारणा करणे योग्य पण सरसकट बँकाचे खासकिकरण करणे म्हणजे गोरगरीब, सर्व सामन्याच्या हिताला नुकसान पोहचविणारे असल्याने याचा युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन निषेध करत असल्याचे भारतीय स्टेट बँकेचे विभागीय अध्यक्ष डॉ. सतीश टाके, सचिव सुनील हट्टेकर, आशिष देवधर, शिवराम खेदुळकर, कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव भास्कर विभुते, मंगेश टिकुळे यांनी म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या