💥राज्यातील अभियांत्रिकी,वैद्यकीय,व्यवस्थापन,हॉटेल मॅनेजमेंट आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सुमारे ४० टक्के जागा रिक्त....!


💥तर व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या ३६ हजार ८९१ जागांपैकी १३ हजार ३९५ जागा रिक्त राहिल्या💥

राज्यातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट आदी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सुमारे ४० टक्के  जागा रिक्त राहिल्या आहेत त्यात विशेषत: अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमांच्या सुमारे ५० टक्के  जागा रिक्त राहिल्या असून, तंत्रशिक्षणाच्या काही विद्याशाखांतील अभ्यासक्रमांना लागलेली घरघर कायम असल्याचे दिसून येत आहे

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी, औषधनिर्माण पदवी आणि पदव्युत्तर पदवी, व्यवस्थापनशास्त्र, संगणकशास्त्र, वैद्यकीय, वास्तुकला पदवी आणि पदव्युत्तर पदवी आदी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे  (सी.ई.टी. सेल) राबवली जाते शैक्षणिक वर्ष २०२०-२१च्या प्रवेश प्रक्रियेला करोनाच्या प्रादुर्भावाचा आणि मराठा आरक्षणाला मे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीचा फटका बसल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली होती.

 प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांचा तपशील सी.ई.टी. सेलकडून संकलित करण्यात आला आहे त्यानुसार तंत्रशिक्षणाच्या विविध विद्याशाखांमध्ये मिळून राज्यभरात ३ लाख ३६ हजार ०१४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या त्यापैकी २ लाख १४ हजार ८६१ जागांवर प्रवेश झाले तर १ लाख ३१ हजार ९८ जागा रिक्त झाल्या आहेत त्यामुळे रिक्त जागांचे प्रमाण जवळपास ४० टक्क्यांच्या घरात असल्याचे दिसून येत आहे अभियांत्रिकी व तंत्रज्ञानच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या २ लाख ३४ हजार ३०० जागांवर १ लाख २९ हजार ८२५ जागांवरच प्रवेश झाले आहेत. 

तर व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीच्या ३६ हजार ८९१ जागांपैकी १३ हजार ३९५ जागा रिक्त राहिल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या