💥पुर्णा तालुक्यातील कातनेश्वर गावात जबरी घरफोडी; पाऊन किलो चांदीसह सोन्याचा ऐवजही केला चोरट्यांनी लंपास....!


💥स्वयंपाक घराचे कुलूप तोडून स्टोअर रूममधील पत्र्याच्या पेटीतील ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला💥 

पूर्णा (दि.१० मार्च) - तालुक्यातील कातनेश्वर येथे आज बुधवार दि.१० मार्च २०२१ रोजी मध्यरात्री ०२-०० ते ०२-३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराच्या चॅनेलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत केलेल्या घरफोडीच्या घटनेत घरातील तब्बल ७५० ग्राम (पाऊन किलो) चांदीसह सोन्याचे दागीने १४ हजार रुपयें रोख रक्कम असा तब्बल ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडल्याने गाव परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील कातनेश्वर गावात प्रकाश चापके यांचे घर असून आज बुधवारी पहाटे ०२-०० ते ०२-३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या चॅनेलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर स्वयंपाक घराचे कुलूप तोडून स्टोअर रूममधील पत्र्याच्या पेटीतील सोन्या-चांदीचे दागीने व नगदी रुपये चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी प्रकाश चापके यांनी पूर्णा पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी मिलींद खोडवे,प्रभारी पोलिस निरीक्षक बी.पी. चोरमले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे,कर्मचार्‍यांसह तात्काळ घटनास्थरावर दाखल झाले. 

प्रकाश चापके यांनी पूर्णा पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले की चोरट्यांनी चॅनेलगेट व त्यानंतर स्वयंपाक घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. स्टोअररूमध्ये ठेवलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीतील ७५० ग्राम (पाऊन किलो) चांदीचा ऐवज ज्यात चांदीची दोन ताटे, चांदीचे दोन ग्लास, चांदीचे दोन पंचेपाळ चांदीचे करडे असा ७५० ग्रॅम वजनाचा ऐवज ज्याची किंमती ४५ हजार रुपये आहे तसेच सोन्याचे १५ ग्राम (दीड तोळे) दागीने,गळ्यातील पोत आणि तीन अंगठ्या, लहान मुलांचे कानातील कुडके दोन जोड हे ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागीने, या शिवाय १४ हजार रुपये रोख असा सुमारे ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे म्हटले. या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश मुळे हे करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या