💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स....!


💥शिवसेना खा.अरविंद सावंत यांनी कारागृहात टाकण्याची धमकी दिली,अमरावतीच्या खा.नवनीत राणा यांचा आरोप💥

 ✍️ मोहन चौकेकर  

1. आता 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

2.45 वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्राचे आभार, मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला होता प्रस्ताव

3.परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 6.3 जीबी डेटा असलेला पेनड्राईव्ह बॉम्ब, पोलीस बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार आणि फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप  ; या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय गृहसचिवांची भेट

4.  परमबीर सिंह यांच्या पत्रावर संसदेत थयथयाट करणारे संजीव भट यांच्या पत्रावर नाचणार का?  खासदार संजय राऊत यांचा भाजपला सवाल

5.सचिन वाझे मनसुख हिरण हत्येतील संशयित आरोपी, गुन्ह्यातील सहभाग तपासात उघड, एनआयएकडून ताबा मिळवण्यासाठी कोर्टात जाणार

6. एनआयएला सापडलेली सचिन वाझे यांची डायरी 100 कोटींची गुपितं उघडणार? पैशाच्या व्यवहाराविषयी कोडवर्डमध्ये नोंदी 

7. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कारागृहात टाकण्याची धमकी दिली, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा आरोप

8. लोन मोरेटोरियम कालावधी वाढवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण कर्जाच्या हफ्त्यावरील चक्रवाढ व्याज माफ करण्याचे आदेश

9. गडचिरोलीत चार जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण, तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश

10. भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना, के. एल. राहुल आणि क्रृणाल पांड्या यांची शतकी भागिदारी, भारताची धावसंख्या 5 गडी बाद 317 धावा, इंग्लंडपुढे 318 धावांचं आव्हान

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या