💥कोरोनाचा साखळदंड तोडणे आवश्यक आहे .पण हा कोरोनाचा साखळदंड तोडायचा कोणी...!

 

💥साखळी मी का तोडु....? 💥

एका जहाजावर एक तरूण काम करत असे . कामात खुप  हुशार व प्रामाणिक होता. साहजिकच सर्वांचा विश्वासपात्र होता. सर्व जण त्याच्या कामाची खुपच स्तुती करायचे. एकदा ते जहाज वादळात सापडले. हेलकावे जास्त बसायला लागले म्हणुन जहाजाचा नांगर सोडण्यात आला पण दुर्दैवाने त्याची लोख॔डी साखळी समुद्रातील खडकात अडकली त्यामुळे जहाज दुहेरी संकटात सापडले. खडकातुन साखळी काढणे किंवा तोडणे हे दोनच पर्याय तिथे होते व हे करण्यासाठी निष्णात माणसाची निवड करणे आवश्यक होते सर्वांनी एकमताने त्या हुशार कर्मचा-याची घोषणा केली व तो ही मोहीम फत्ते करायला निघाला पण जाता जाता विचार करायला लागला मी हुशार सर्वात जुना मग हे साखळी काढण्याचे वा तोडण्याचे हलके काम मी का करू............ ?

💥पुढची कहाणी नाही सांगत कारण त्याने साखळी नाही तोडली तर काय होईल याची कल्पना आपल्याला आलीच असेल💥

असो ही कथा सांगण्याचे कारण म्हणजे ही कथा वाचत असतानाच आजची कोरोना परिस्थिती समोर दिसु लागली. अख्खा महाराष्ट्र या कोरोना रूपी वादळात सापडला आहे. यातुन सर्वांची जीवन नौका सुरक्षित बाहेर काढण्यासाठी  या कोरोनाचा साखळदंड तोडणे आवश्यक आहे .पण हा कोरोनाचा साखळदंड तोडायचा कोणी.

कांही जण खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्न ही करत आहेत पण मधेच कांही जण *साखळी मी का तोडु*  असे म्हणुन नियम न पाळता बिनधास्त वागत आहेत.  ज्याचा परिणाम सगळा  महाराष्ट्र भोगतो आहे.  आता तर खुप प्रमाण वाढले आहे. लाॅकडाऊन हा पर्याय आहे का नाही हे माहित नाही  पण यामुळे गरीब आणखी जास्त भरडला जाईल व हे त्याहुन ही भयानक आहे. म्हणून पुन्हा लाॅकडाऊन नको असेल तर कोरोना साखळी आताच तोडावी लागेल.  घराघरात पेशन्ट निघायले लागले तर पुन्हा साखळी तोडुन काय उपयोग. 

म्हणून सर्वांना विनंती आता तरी सर्वांनी सावध होणे अति गरजेचे .

  मास्क सतत वापरणे, हेच सर्वांस सांगणे सुरक्षित ठेवुया अंतर,जवळचा परका हे नंतर वांरवार हात धुणे,मग कोरोनाला कसले भिणे गर्दीत जाणे टाळू, शासन नियम पाळु कोरोनाला करणार हद्दपार,कोरोना साखळी मी तोडणार कोरोना साखळी मी तोडणार 


शिवकुमार केदारी

*हिंदनगर, परळी वैजनाथ*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या