💥औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर-करंजगाव दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरुण युवक जखमी....!


💥जखमी तरुणास घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे💥

औरंगाबाद (दि.१६ मार्च) मनमाड सिकंदराबाद अजंठा एक्सप्रेस चा लासूर करंजगाव दरम्यान रेल्वे किमी 74/6-7 ढेकू नदी जवळ धक्क्याने संतोष परसराम फुलकर वय 35 ते 40 हा गंभीर जखमी झाला यास तात्काळ मुंबई नांदेड एक्सप्रेस घटनास्थळी थाबवून औरंगाबाद येथे आणून घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या कामी रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी रेल्वे सेना सदस्य विजय राऊत उर्फ सावकार,दत्तू पडसे,नंदीग्राम एक्सप्रेस गार्ड S मीना यांनी रेल्वेत चढवले याकामी रेल्वे नियंत्रण कक्ष नांदेड , पोलीस नियंत्रण कक्ष (ग्रामीण ) अधिकारी पुरी सर शिल्लेगाव पोलीस ,वैजापूर पोलीस यांनी अनमोल सहकार्य लाभले केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या