💥राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एन.आय.ए.) मोठा खुलासा....!


💥अँटिलिया बाहेरच्या सिसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच💥 

अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या कुणी? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडलेलं नाही मात्र अँटिलियाबाहेरच्या सी.सी.टी.व्ही.मध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं एन.आय.ए. नं आता स्पष्ट केलं आहे. 

ए.एन.आय.नं यासंदर्भात माहिती दिली असून सी.सी.टी.व्ही.मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने पी.पी.ई. (P.P.E.) किट घातलेलं नसून साधा कुर्ता-पायजमा घातला असल्याचं देखील एन.आय.ए.नं सांगितलं आहे या प्रकरणी अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणाचा तपास एन.आय.ए. करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ए.टी.एस. करत आहे.

मुंबई सी.आय.यू.चे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात असलेला कथित सहभाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यानच्या काळात अँटिलियाबाहेरचं एक सी.सी.टी.व्ही.फूटेज एन.आय.ए.नं तपासासाठी घेतल्यानंतर ते सोशल मीडियावर देखील व्हायर होऊ लागलं सी.सी.टी.व्ही.फूटेजमध्ये एक व्यक्ती पी.पी.इ (P.P.E.) किट घालून अँटिलियाच्या बाहेरून जात असल्याचं दिसत आहे. 

मात्र आता हे पी.पी.ई. किट नसून तो कुर्ता-पायजमा असल्याचं एन.आय.ए.नं स्पष्ट केलं आहे तसेच ते सचिन वाझेच असून त्यांनी आपला चेहरा ओळखू येऊ नये म्हणून मोठ्या हातरुमालाने झाकून घेतला आहे, असं देखील एन.आय.ए.नं म्हटलं आहे आपली हालचाल कुणाच्या लक्षात येऊ नये, म्हणून सचिन वाझेंनी कुर्ता-पायजमा घातल्याचं देखील एन.आय.ए.नं सांगितलं आहे. 

 दरम्यान, एन.आय.ए.नं सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप जप्त केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या