💥परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील फरकंडा येथील उर्वरित शेतकरी मोबदल्या पासून अद्यापही वंचित....!


💥बंधाराग्रस्त शेतकऱ्यांनी यापुर्वी सुध्दा जिल्हा प्रशासनाला अनेकवेळा निवेदन दिली आहेत💥

परभणी (दि.23 मार्च) जिल्ह्यातील पालम तालुक्यातल्या दिग्रस बंधारा येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली जाऊन दिग्रस बंधाऱ्यात जाऊन अजूनही शेतकऱ्यांना मावेजा मिळालेला नाही.तातडीने मावेजा मिळावा यासाठी वेळोवेळी पाठपुरावा शासनास वेळोवेळी करण्यात येत आहे. मागील काळात बंधाराग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषणाला बसले होते त्या वेळेस अतिरिक्त जिल्हा व दंडाधिकारी महेश वडदकर यांनी उपोषण मागे घ्या असे सुचवले होते लवकरच मावेजा मिळून जाईल असे आश्वासन दिले होते तरी पण अजूनही कारवाई करण्यात आली नाही. व केलेल्या कारवाई आम्हाला अवगत करण्यात आलेले नाही बंधाराग्रस्त शेतकऱ्यांनी यापुर्वी सुध्दा जिल्हा प्रशासनाला पुढील तारखेत निवेदन दिलेली आहेत 25/01/2021,24/01/21,/23/1120,16/02/21 परंतु अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही तरी मे जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ते कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा असे निवेदनात म्हटले आहे. 

नसता नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी येथे अमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी गांभीर्यपूर्वक लक्ष देण्यात यावे अन्यथा 15/04/21  प्रश्‍न मार्गी न लागल्यास आमरण उपोषण करण्यात येईल याची गांभीर्यपूर्वक प्रशासनाने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा  या निवेदनावर प्रसाद पोळ यांची स्वाक्षरी आहे आज दिनांक 23 /03/ 21/ पालम तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या