💥सोनपेठ तालुक्यातील सोनखेड हनुमान मंदिर परिसरातील १ हजार वृक्षांची तोडफोड...!


💥शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशन च्या वतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लावण्यात आले होते वृक्ष💥

सोनपेठ (दि.३० मार्च) - तालुक्यातील सोनखेड हनुमान मंदिर परिसरात मागील जानेवारी २०१९ या वर्षी शहिद सरदार भगतसिंघ फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने केलेल्या 'झाडे लावा झाडे जगवा' या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तब्बल १ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली होती. 


शहीद सरदार भगतसिंग फाउंडेशन च्या वतीने लावण्यात आलेली ही झाडे एका लोकप्रतिनिधीच्या बालहट्टा मुळे वृक्ष तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून त्या ठिकाणची झाडे तोडून तिथे क्रिकेटचे ग्राउंड बनविले गेले त्याचा जाब सामाजिक कार्यकर्त्यांकडून  विचारला गेला असता जागा तुमच्या बापाची नाही मी जनता प्रतिनिधी आहे मी काही पण करु शकतो अशा उध्दट वाक्याचा प्रयोग संबंधित लोकप्रतिनिधीने केल्याने जनसामान्यांतून संताप व्यक्त केला जात असून जर लोक प्रतिनिधी जर अश्या प्रकारे बेजवाबदार पणाची भाषा करत असतील तर जनता पुढील मतदाना वेळेस अश्या लोक प्रतिनिधीचा माज उतरल्याशिवाय राहणार नाहीत एवढे मात्र निश्चितच....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या