💥वाशिम पोलिस प्रशासनाची अत्यंत धाडसी व कौतुकास्पद कामगिरी.....!


💥पोलिसांनी २४ तासात लावला शेलुबाजार येथील खुन प्रकरणाचा गुन्ह्याचा तपास💥

वाशिम :- ०२/०३/२०२१ रोजी फिर्यादी योगेश प्रकाश पानभरे वय २० वर्षे रा शेलुबाजार , मंगरुळपीर वाशिम यांनी पोस्टे मंगरुळपीर येथे तक्रार नोंदविली की , दिनांक ०१/०३/२०२१ रोजी ते त्यांचे कुटुंबासमवेत रात्री १०/०० चे सुमारास घरी हजर असताना फिर्यादी यांना अहिल्या चौकात राहणारे त्यांचे चुलत भाऊ मयत विठठल अशोक पानभरे यांचा फोन आला की , त्यांची मोटार सायकल व गल्लीतील कुलदिप कोडु गाडवे वय २७ वर्षे याची कार अहिल्या चौकात उभी करण्याच्या कारणावरुन त्यांच्या दोघात भांडण झाल्याचे मागितले व फिर्यादी यांना भांडण सोडविण्याकरीता बोलाविले . यातील फिर्यादी हे तात्काळ अहिल्या चौकात गेले कुलदिप कांडु गाढव व फिर्यादी यांचे भाऊ मयत विटठल पानभरे यांच्यातील भांडण सोडवुन दोघांना आपआपले घरी पाठविले . वरील सर्व हकिकत ही फिर्यादी यांनी त्यांचे वडील श्री . प्रकाश विठठल पानभरे यांना सांगितली त्यामुळे फिर्यादी व त्यांचे वडील यांनी मयत विठठल अशोक पानभरे यांना आपले घरी आणण्याचे ठरविले जेणे करुन परत कुलदिप व फिर्यादीचे भाऊ यांच्यात वाद होवु होणार नाही . फिर्यादी व त्यांचे वडील हे तात्काळ रात्री अंदाजे १०.३० सुमारास मोटारसायकलने अहिल्यादेवी चौक येथे जाण्यासाठी निघाले असताना नागपुर ते औरंगाबाद हायवे वरील डॉ जयस्वाल यांचे घराचे पायरी जवळ विठठल पानभरे हा पडलेला दिसला फि व त्यांचे वडीलांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांचे पोटातुन रक्त निघत होते व पोटातील आतडे बाहेर निघालेले दिसले व तो कण्हत व्हिवळत असताना दिसुन आला . त्याला जवळ जाऊन विचारपुस केली असता कुलदिप गाढव यानी त्यांचे पोटात चाकु मारल्याचे सांगितले . फिर्यादी व त्यांचे वडीलांनी मयत विठठल अशोक पानभरे यांना सरकारी हॉस्पीटल येथे नेले असता त्यांना अकोला येथे रेफर केले . फिर्यादी यावे गावातील संदिप गाडवे.शामा बरगे यांनी खाजगी वाहनातुन विठठल अशोक पानभरे यांना अकोला येथे उपचारा करीता दवाखान्यात दाखल केले असता अंदाजे रात्री १२ . ३० वा दरम्यान फिर्यादी चे भाऊ सचिन पानभरे यांनी विठठल हा मरण पावल्याचे सांगितले . अशा रिपोर्ट वरून पोलीस ठाणे मंगरुळपीर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १००/२१ कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा नोंदवुन तपासात घेतला . नमुद गुन्हा घडल्यानंतर यातील आरोपी कुलदिप कोंडु गाडवे हा फरार झाला . मा . पोलीस अधिक्षक श्री . वसंत परदेशी सो यांनी केलेल्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मंगरुळपीरचे, उपविभागीय पोलीस अधिकारी व मंगरुळपीर चे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अशी वेगवेगळी पथके तयार करुन फरार आरोपी कुलदिप कोंड़ गाडवे यांच्या शोधार्थ रवाना केले . त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काल रात्री पासुन आरोपी याचे मागावर राहिले त्यांनी नमुद आरोपीचा मंगरुळपीर , आसेगाव अनसिंग , हिंगोलो भागात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही . आज दिनांक ०२/३/२०२१ रोजी गोपनीय बातमीनुसार यातील फरार आरोपी कुलदिप कोंडु गाडवे हा वाशिम येथे असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ फरार आरोपीचे शोधार्थ रवाना झाले व नमुद फरार आरोपी कुलदिप कोडु गाडवे याला हिंगोली नाका येथुन ताब्यात घेतले . अशा प्रकारे मा . पोलीस अधिक्षक श्री वसंत परदेशी , अपर पोलीस अधिक्षक श्री विजय कुमार चव्हाण यांचे मार्गदर्शनात दाखल खुनाये गुन्हयाचा पोलीस निरीक्षक शिवाजी ठाकरे , सपोनि अतुल मोहनकर , अजयकुमार वाढवे , पोना प्रेमदास आढे , प्रशांत राजगुरू , पोकॉ आश्विन जाधव , राजेश गिरी , किशोर खंडारे , निलेश इंगळे , राम नागुलकर , चालक रमेश थोरवे , संदीप डाखोरे यांनी तपास करून उलगडा केला आहे . नमुद फरार आरेपी हा पोलीसांचे ताब्यात असुन अटकेची कारवाई सुरू आहे . नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक तुषार जाधव हे करीत आहेत .


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या