💥परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात जिल्हाधिकारी जगताप यांच्या हस्ते पुजा....!


💥कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने मोजक्याच नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आली पुजा💥

 परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी) येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वैद्यनाथ मंदिरात श्रींची पुजा प्रथेप्रमाणे गुरुवारी (दि.११) सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते करण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने मोजक्याच नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आली.     कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ८ ते १६ मार्च वैद्यनाथ मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. महाशिवरात्री महोत्सवही रद्द करण्यात आला. मात्र पारंपरिकरित्या प्रथेप्रमाणे महाशिवरात्रीला सायंकाळी सहाच्या सुमारास श्रींस अभिषेक, पुजा आरती करण्यात येते. मंदिर बंद असतानाही देवस्थान ट्रस्ट व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.११) महाशिवरात्रीला जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या हस्ते अभिषेक, पुजा करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजूळ, देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांच्या सह विश्वस्त उपस्थित होते. यावेळी इतर कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. यंदा मंदिरातही बंद असल्याने प्रवेश देण्यात आला नाही. शिवभक्तांना पायरीचेही दर्शन घेता आले नाही...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या