💥परभणीतील एकबाल नगरात स्थागुशाची धाडसी कारवाई; स्वीफ्ट डिझायर कारसह २ लाख ७० हजाराचा गुटखा जप्त...!


💥कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेकडून ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

परभणी (दि.२२ मार्च) - परभणी शहरातील एकबाल नगर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रविवार दि.२१ मार्च २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास केलेल्या धाडसी कारवाईत २ लाख ७० हजार रुपयांच्या प्रतिबंधीत विषारी गुटखा साठ्यासह स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांना शहरातील एकबालनगरात मोठ्या प्रमाणात गुटक्याचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शऩाखाली श्री. आलेवार यांच्यासह नवामोंढा पोलिस ठाण्याचे फौजदार शैलेश जाधव, कर्मचारी बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, पिराजी निळे, मोबीन पठाण, महिला कर्मचारी जयश्री आव्हाड, रमेश मुजमुले यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रविवारी रात्री दहाच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी तेथे शासनाने बंदी घातलेला गोवा कंपनीचा गुटका कारमध्ये आढळून आला. पथकाने त्या गुटक्याची मोजदाद केली तेव्हा २ लाख ७० हजार रुपयांचा गुटका असल्याचे निदर्शनास आले. पथकाने गुटक्याची वाहतुक करण्यासाठी वापरत असलेली स्वीफ्ट डिझायर कारही क्र.एमएच ०४ जीडी ४२१९ जप्त केली. या कारवाईत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्याचे कर्मचारी रमेश मुजमुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे हे करीत आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या