💥फ्रान्स मधील राफेल कंपनीच्या मालकाचं हेलिकॉप्टर अपघातात निधन....!


💥फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सची सतत सेवा करणारं व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली💥

फ्रान्स मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक अशणाऱ्या राफेल लढाऊ विमाने तयार करणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर दसॉ यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला आहे दसॉ हे फ्रान्सच्या संसदेचेही सदस्य होते दसॉ हे सुट्ट्यांनिमित्त गेले असता  एका हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करताना, फ्रान्सची सतत सेवा करणारं व्यक्तीमत्व हरवल्याची भावना व्यक्त केली. 

दसॉ यांच्या खासगी हेलिकॉप्टरला नॉर्मंडी परिसराजवळ अपघात झाला स्थानिक वेळेनुसार रविवारी सायंकाळी सहा वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास) दसॉ यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची माहिती ए.एफ.पी.च्या हवाल्याने देण्यात आलीय.“ओलिवियर दसॉ यांचे फ्रान्सवर प्रचंड प्रेम होतं त्यांनी उद्योजक, स्थानिक लोकनियुक्त अधिकारी, लोकप्रतिनिधी, वायूसेनेचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. 

त्यांचा अशाप्रकारे मृत्यू होणं हे देशाचं खूप मोठं नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि जवळच्या व्यक्तींप्रती सहानुभूती व्यक्त करतो,” असं मॅक्रॉन यांनी आपल्या ट्विटमध्ये दसॉ यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे ६९ वर्षीय ओलिवियर दसॉ हे फ्रान्समधील उद्योगपती आणि अब्जाधीश असणाऱ्या सर्ज दसॉ यांचे पुत्र होते ओलिवियर यांची कंपनीच जगप्रसिद्ध राफेल लढाऊ विमानं तयार करते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या