💥परभणी जिल्हा पोलिस दलातील १४७ पोलिस कर्मचार्‍यांना जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिली पदोन्नती...!


💥जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती💥

परभणी (दि.१७ मार्च) - परभणी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व अत्यंत शिस्तप्रीय जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी आज बुधवार दि.१७ मार्च २०२१ रोजी एक आदेश जारी करून जिल्हा पोलिस दलातील १४७ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नती बहाल केली आहे.पदोन्नती बहाल केलेल्या कर्मचाऱ्यात ६८ पोलिस शिपायांना पोलिस नाईक म्हणून तर ४९ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदारपदी तर ३० पोलिस हवालदार यांना सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती दिली आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मिना यांनी बुधवारी जिल्ह्यातील विविध पोलिस स्थानकात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नतीचे आदेश जारी केले. यात पोलिस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या ६८ कर्मचार्‍यांना पोलिस नाईक म्हणून पदोन्नती दिली. त्याचबरोबर पोलिस नाईक म्हणून ४९ कार्यरत कर्मचार्‍यांना पोलिस हवालदारपदावर तर पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या ३० कर्मचार्‍यांना सहाय्यक फौजदार पदावर त्यांनी पदोन्नती बहाल केली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या