💥परभणी येथील इंजिनियर ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझेंवर हत्येचे आरोपपत्र दाखल होणार ?


💥काय आहे इंजिनियर ख्वाजा युनूस प्रकरण ?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीची चिठ्ठी ठेवलेली गाडी बेवारस सोडताना परिधान केलेले कपडे आरोपी सचिन वाझे यांनी मुलुंड परिसरात जाळून नष्ट केले, असा दावा गुरुवारी ‘एन.आय.ए’ ने केला. वाझे यांनी वापरलेल्या आणखी दोन महागड्या गाड्याही या पथकाने जप्त केल्या अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीच्या रात्री बेवारस सापडलेल्या स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही होती या गाडीतून एक व्यक्ती उतरली स्कॉर्पिओची पाहणी करून ती निघून गेल्याचे परिसरातील सिसीटीव्ही. चित्रणावरून स्पष्ट झाले ही व्यक्ती म्हणजे वाझेच होते, असा दावा ‘एन.आय.ए' ने केला. 


त्या वेळी परिधान केलेले कपडे वाझे यांनी मुलुंड परिसरात जाळले पुरावा सापडू नये, या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले, असा दावा ‘एन.आय.ए.’च्या अधिकाऱ्याने केला एकीकडे रोज वाझे प्रकरणासंदर्भात नवे नवे खुलासे होत असतानाच दुसरीकडे ज्या प्रकरणावरुन २००४ साली वाझेंचं निलंबन झालं होतं त्या परभणी येथील इंजिनियर ख्वाजा युनूस प्रकरणाचीही चर्चा आता रंगू लागली आहे सर्वात आधी वाझे ज्या २७ वर्षीय ख्वाजा युनूस हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलं ते नक्की काय होतं ? आणि आज या प्रकरणाची स्थिती काय आहे ? यासंदर्भात आपण जाणून घेऊयात.

💥परभणी येथील इंजिनियर ख्वजा युनूस प्रकरण नेमके काय आहे पाहा ?

मुंबईत घाटकोपर येथे २ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटातील सहभागावरुन मुंबई पोलिसांनी मुळचा परभणी येथील रहिवासी असलेल्या इंजिनियर ख्वाजा युनूससहीत चार जणांना अटक केली होती.

दुबई येथे नौकरी करुन मुंबईत परत आल्यानंतर मुंबई पोलिसांनी इंजिनियर ख्वाजा युनूसला २५ डिसेंबर २००२ रोजी प्रिव्हेन्शन ऑफ टेररिस्ट अ‍ॅक्टीव्हीटी म्हणजेच पोटा कायद्याखाली अटक केली होती.तपासाचा एक भाग म्हणून दि.६ जानेवारी २००३ रोजी ख्वजा युनूस व अन्य तिघांना घाटकोपर पोलिस स्थानकात पोलिस कस्टडीत ठेवण्यात आले यावेळी ख्वाजा युनूस यास पोलिस कस्टडी दरम्यान गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आल्याचे व यानंतर त्याला गायब करण्यात आल्याचे सहकारी आरोपीकडून सांगण्यात आले परंतु या संदर्भात जवाबदार अधिकारी म्हणून वाजे यांना विचारणा झाली असता वाजे यांनी असे नमूद केले होते की आरोपी ख्वाजा युनूस यास तपासकामी औरंगाबाद येथे घेऊन जात असता वाहनाला अपघात झाला दरम्यान या अपघाता नंतर ख्वाजा युनूस पळून गेला सदरील घटना संशयास्पद वाटल्याने ख्वाजा युनूस यांच्या कुटुंबाने घटनेच्या चौकशी संदर्भात औरंगाबाद हायकोर्टात धाव घेतली असता हायकोर्टाने तपास सिआयडीकडे दिला यावेळी सिआयडी तपासात तत्कालीन सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाजे,सहकारी पोलिस कर्मचारी राजेंद्र तिवारी,सुनील देसाई,राजाराम निकम हे चौघे दोषी आढळल्याने चौघांना निलंबीत करण्यात आले तब्बल सोळा वर्षे निलंबीत असलेल्या सचिन वाजे यांना पुन्हा पोलिस दलात कार्यरत करण्यात आले घाटकोपर बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या ख्वाजा युनूस व इतर सात अश्या आठ आरोपीं पैकी सात आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडले असले तरी या प्रकरातील ख्वाजा युनूसला मात्र पोलिसी अत्याचारात आपले प्राण गमवावे लागले ख्वाजा युनूस यांची आई आशिया बेगम आजही आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी अपेक्षा बाळगून आहे,..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या