💥महामार्गावर अडचन येत असल्याने झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेवर चालला बुलडोझर...!


💥शाळेचे दस्तऐवज दबले ढिगाऱ्याखाली ?💥

वाशिम (दि.९ मार्च) :- मालेगाव तालुक्यातील झोडगा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत महामार्गाच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने वाशिम जिल्हा प्रशासनाने जेसीबी लावून शाळा जमीनदोस्त केली आहे. दरम्यान शाळेवर जेसीबी चालवीत असताना शाळेचे दस्तऐवज शाळेतून बाहेर काढले नसल्याने याप्रकरणी शाळा प्रशासनाला याची माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पहिली ते पाचवी भरणारी शाळा जमीनदोस्त केल्यामुळे आता नव्याने शाळा बांधकाम करावे लागणार आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या