💥जेजुरी येथील वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची सुटका.....!


💥याप्रकरणी मूळचा साताऱ्यातील गुनवडी येथील संकेत गावडे व जेजुरीतील स्थानिक ऋषिकेश घाडगे या दोघांना अटक💥

जेजुरी येथील मध्य वस्तीमध्ये असणाऱ्या खोल्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन जणांना पकडण्यात आले व दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली याप्रकरणी मूळचा साताऱ्यामधील गुनवडी येथील असणाऱ्या संकेत गावडे व जेजुरीमधील स्थानिक ऋषिकेश घाडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील दोन खोल्यांमध्ये अनैतिक व्यापार करण्यासाठी दोन महिलांना ठेवण्यात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली त्यांनी दोन पंचांसमक्ष दोन हजार रुपये देऊन बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठविले आरोपी पैसे घेऊन मुली देण्यास तयार झाले यानंतर पोलिसांनी छापा मारून मुंबईतून आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका केली.

या पीडित मुलींना फलटण येथे दलालाकडे पाठवण्यात येणार होते अशी माहिती मिळाली अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जेजुरीत कुठेही वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती कोणाला मिळाल्यास त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे लॉज मालकांनी काळजी घेण्याची आवाहन जेजुरी हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. लॉजवर आलेल्या पुरुषांबरोबरच महिलांचेही ओळख पत्र घेणे आवश्यक आहे.

त्याशिवाय कोणाला प्रवेश देऊ नये गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लॉज मालकांनी आपले रजिस्टर व्यवस्थित ठेवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या