💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स....!


💥सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांना भोवणार ? अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत💥

✍️ मोहन चौकेकर 

1. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मुख्य सचिवांना पत्र ; आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या भेटीला; कोरोना लसीचा पुरवठा वाढवण्याची मागणी 

2. देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली, चोवीस तासात 24 हजार नव्या रुग्णांची भर, एकट्या महाराष्ट्रात 15 हजार नवे कोरोनाबाधित ; कोरोनाचा वाढता धोका पाहता, मुंबईसह राज्यातही निर्बंध लागू 

3. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पुण्यात कोरोनाचा प्रसार झाल्याचा संशय, बंदोबस्ताला असलेल्या पाच पोलिसांना कोरोनाची लागण ; नाशिकमध्ये कोरोनाच्या संशयित रुग्णांकडून गुपचूप HRCT चाचणी करुन घरीच उपचार 

 4. सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्तांना भोवणार ? अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

5. सचिन वाझे यांनी आपल्याच सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले? 

6. वरुण सरदेसाई यांनी दिलेलं स्पष्टीकरण म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार, आमदार नितेश राणे यांचं वरुण सरदेसाई यांना प्रत्युत्तर 

7.  जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे मागील 55 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी ठिय्या देणाऱ्या आंदोलकांना अटक, मराठा नेत्यांकडून सरकारचा तीव्र निषेध

8. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप ; चंद्रकांत पाटील यांनी केलेले आरोप धादांत खोटे आणि मराठा समाजाची दिशाभूल करणारे असल्याचं अशोक चव्हाण याचं प्रत्युत्तर

9. केंद्र सरकारची प्रति लिटर पेट्रोलमागे 33 रुपये तर डिझेलमागे 32 रुपयांची घसघशीत कमाई, संसदेत लेखी उत्तरात कबुली, पेट्रोल-डिझेल जीएमसीअंतर्गत आणण्याचा कोणताही प्रस्ताव नाही  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या