💥पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील अतिक्रमण धारकांना पाठीशी न घालता तात्काळ अतिक्रमण हटवा...!


💥परभणीचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांना सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आले निवेदन💥

प्रतिनिधी 

परभणी (दि.२ मार्च) - पूर्णा शहरातील डॉ.आंबेडकर चौकातील  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे ही मागणी साठी पुर्णा नगर परिषद कार्यालया समोर सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीने दि.५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सातत्याने धरणे आंदोलन सुरू होते परंतु कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करीत सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने अतिक्रमण विरोधी धरणे आंदोलनास तात्पुती स्थगिती देण्यात आली परंतु यानंतरही नगर परिषद प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला अतिक्रमण विरोधी आंदोलकांकडून निवेदनाच्या माध्यमातून आणि मोबाईल व्हाट्सअप वर वारंवार माहिती देऊन सुद्धा जाणीवपूर्वक प्रशासन अतिक्रमणधारकांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्हाध्यक्ष राजकुमार सुर्यवंशी  यांनी केला आहे.


शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमणाच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाणी सर्वपक्षीय संघटना सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज पुन्हा परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की या अतिक्रमणाच्या गंभीर विषयाकडे आपण स्वतः तात्काळ लक्ष घालून अतिक्रमण काढण्याच्या दिशेने कठोर पावल उचलावी अन्यथा सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने महामोर्चा काढण्यात येईल असाही इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी मुगळीकर यांना दिलेल्या निवेदनावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य सचिव गौतम मुंडे,बहुजन समाज पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य भीमराव जोंधळे,बी.आर. आंबेडकर सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे,रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी मानव हित लोकशाही लोकशाही पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड भिम प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विश्वजीत  वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड भारतीय जनता पार्टी  जिल्हा उपाध्यक्ष विलास जोंधळे,बहुजन समाज पार्टी जिल्हा सचिव धारबा गायकवाड इंजन ग्रुप मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश खरे,पीपल्स रिपब्लिकन पार्टी पूर्णा तालुका अध्यक्ष संजय शिंदें,राष्ट्रीय समाज पक्ष तालुका संघटक नागेश एंगडे,रिपब्लिकन सेनेचे युवा नेते राहुल पुंडगे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष पंडावीर रिपब्लिकन सेना पूर्णा तालुका उपाध्यक्ष विशाल खंदारे बंडू आहिरे आदींसह महिला व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या