💥जेष्ठ धम्म उपासिका शांताबाई बलखंडे यांच्या अकाली निधनामुळे पूर्णा शहरावर पसरली शोककळा........!


💥दैनिक वृत्तरत्न सम्राटचे तालुका प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते कैलास कुमार बलखंडे यांच्या त्या मातोश्री होत्या💥

पूर्णा (दि.१६ मार्च) - आंबेडकरी धम्म चळवळीतील ज्येष्ठ धम्मउपासिका शांताबाई विठ्ठल राव बलखंडे यांचे नांदेड या ठिकाणी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.सामाजिक धार्मिक आंबेडकरी चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेल्या शांताबाई यांनी बामसेफचे परभणी जिल्ह्याचे समर्पित कार्यकर्ते आपले पती दिवंगत विठ्ठलराव बलखंडे यांच्या सामाजिक कार्यात समर्थ साथ दिली.एकच संस्कारक्षम आदर्श माता म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जायचं.

आप्तेष्ट नातेवाईक व सगेसोयरे यांच्यावर अडीअडचणीच्या सुख दुःखाच्या प्रसंगी त्या धावून जायच्या स्वभावाने अतिशय प्रेमळ मितभाषी निगर्वी निर्मोही होत्या पतीच्या निधनानंतर आपल्या सर्व मुला-मुलींना त्यांनी उच्चशिक्षित व संस्कारित केले त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली नातवंडे असा फार मोठा परिवार आहे.

दैनिक वृत्तरत्न सम्राट चे तालुका प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते कैलास कुमार बलखंडे यांच्या त्या मातोश्री होत्या नांदेड या ठिकाणी अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या