💥मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी साहेब यांना राष्ट्रपती पुरस्कार...!


💥राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री.तांबोळी यांच्याकडे अत्यंत शिस्तप्रीय व कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून जाते💥

नांदेड - लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र तथा मुंबई क्राईम ब्रँचचे पुर्व आयपीएस अधिकारी तथा नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक निसार तांबोळी साहेब यांनी क्राईम ब्रँच मध्ये असतांना उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल त्यांना भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता त्यावेळी त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले होते.

निसार तांबोळी हे 1996 पासून सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत.आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत,हिंगोली,नांदेड,वर्धा,नंदुरबार,अमरावती,नाशिक,मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते,2008 ते 2009 एअरपोर्ट झोन,2015 ते 2017 औरंगाबाद येथे SRPF येथे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.

त्यांना यापूर्वी SRPF औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे.

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या निसार तांबोळी याना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना आवडते,स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही.एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे,मुंबई क्राईम ब्रँच साठी दुसऱ्यांदा प्रशासनाने त्यांना पाचारण केले आहे,जिथे पाठवेल तिथे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची तयारी आहे अत्यंत कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून परिचित असलेले श्री.निसार तांबोळी साहेब नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उप महानिरिक्षक म्हणून कार्यरत असून अत्यंत शिस्तप्रीय अधिकारी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते....

[नांदेड परिक्षेत्रात विशेष पोलिस उप महानिरिक्षक म्हणून कार्यरत श्री. निसार तांबोळी साहेब यांना फार पुर्वी म्हणजे तिन तेचार वर्षापूर्वीच राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला असून २०१७ यावर्षी Indian Discovery या फेसबूक पेजवर आलेली पोस्ट वरून घेतलेली बातमी आहे...]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या