💥'ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जातेय; मे.सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता.....!


💥मे.सर्वोच्च न्यायालय ओ.टी.टी.प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे💥

मे.सर्वोच्च न्यायालयाने ओ.टी.टी. म्हणजेच ‘ओव्हर द टॉप’ प्लॅटफॉर्म्सवर दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे.काही ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर पॉर्नोग्राफी दाखवली जात आहे.ओ.टी.टी.वर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचंही स्क्रीनिंग होणं गरजेचे आहे असं मत मे.सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे.मे.सर्वोच्च न्यायालय ओ.टी.टी.प्लॅटफॉर्मसंदर्भात केंद्र सरकारने तयार केलेली नियमावली पाहणार आहे.

त्यानंतर मे.न्यायालय पुढील सुनावणी  करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.मे.सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅमेझॉन प्राईमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवरील कंटेंटसंदर्भात चिंता व्यक्त करणारं वक्तव्य केलं आहे.अ‍ॅमेझॉन प्राईमवरील तांडव या वेब सीरीजमुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अपर्णा पुरोहित यांच्यासहीत अनेक कलाकार आणि निर्देशकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी मे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने अपर्णा पुरोहित यांची अटकपूर्व जामीनासंदर्भातील याचिका फेटाळली आहे.यानंतर अपर्णा यांनी मे.सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलीय.अपर्णा यांच्या अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर मे. न्यायालयामध्ये केवळ दोन मिनिटांची सुनावणी झाली.सुनावणीच्या सुरुवातीला न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी ओ.टी.टी. प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या गोष्टींचीही स्क्रीनिंग झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

 म्हणजेच ज्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो पाहून त्यामधील बदल सुचवतं तसं ओ.टी.टी.वरील कंटेंटसाठीही अशाप्रकारचं प्रदर्शानापूर्वीचं स्क्रीनिंग झालं पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या