💥बँड व्यावसायिकांना परवानगी द्या : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवा विदर्भ अध्यक्ष छोटु कांबळे यांची मागणी...!


💥चिखली तालुक्यातील बँड व्यावसायिकांवर कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 11 महिन्यापासून उपासमारीची वेळ💥

✍️  मोहन  चौकेकर

चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील व चिखली तालुक्यातील बँड व्यावसायिकांना रीतसर परवानगी देण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्या मार्फत दि.2 मार्च 2021 रोजी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे युवा विदर्भ अध्यक्ष भाई छोटु कांबळे ,युवा जिल्हाध्यक्ष दिलीप काळे यांच्यासह बॅड व्यावसायिक यांनी दिले. 


निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील व खासकरून चिखली तालुक्यातील बँड व्यावसायिक कोरोनाच्या संकटामुळे गेल्या 11 महिन्यापासून उपासमारीची वेळ ओढवल्याने बँड व्यावसायिक व कलाकार कर्जबाजारी झाले आहे.आजरोजी लग्नसराईत वांजत्री बंद झाल्यामुळे कुटुंबावर भूकबळीची वेळ आली आहे.शासनाने लग्न समारंभासाठी केवळ 25 लोकांची उपस्थिती असल्याचे निर्देश दिलेले आहे.तरी प्रशासनाने 25 लोकांना व्यतिरिक्त वाजंंत्री यांना रीतसर परवानगी देण्यात यावी.तसेच बँड व्यावसायिक यांना परवानगी देण्यात यावी अन्यथा डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा विदर्भ प्रदेश अध्यक्ष भाई छोटु कांबळे , युवा जिल्हाध्यक्ष दिलीप काळे , बॅड व्यावसायिक जेष्ठ नेते रामदास कांबळे,शेषराव साळवे, प्रवीण कांबळे, रमेश घाडगे,सुभाष कांबळे, यांच्यासह बँड व्यावसायिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

🔶बँड कलाकार "बळीराम साबळे" ठरला पहिला "बळी"🔶

चिखली तालुक्यातील पेठ येथील बँड कलाकार बळीराम साबळे याने उपासमारी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे बँड बंद होऊन हातचे काम गेले व संपूर्ण कुटुंबावर  उपासमारीची वेळ आल्याने बळीराम साबळे यांने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे बँड व्यावसायिक व समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे. तरी या कुटुंबाला प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी डीपीआय करणार  आहे.... 

✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या