💥पुर्णा नगरपरिषदेच्या घरकुल घोटाळ्यात कुशाग्र असोसिएट प्रा. लि.या एजन्सीची चौकशी होणार काय ?


💥सामाजीक कार्यकर्ते शे इरफान यांची जिल्हाधिकारी यांना तक्रार💥 

पूर्णा (दि.१५ मार्च) :- पूर्णा नगर परिषद प्रशासनाकडून प्रधामंत्री आवास योजनेचे कामाचे गुत्ते कुशाग्र असोसिएट प्रा.लि.नांदेड़ या एजेंसीला देण्यात आले होते परंतु संबंधित एजन्सीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याने संबंधित एजन्सी विरोधात सामजिक कार्यकर्ते शेख इरफ़ान शेख बाबू यांनी परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्याकडे लेखी स्वरुपात तक्रार केली होती. 

शेख इरफान यांनी दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी मुगळीकर यांना दिलेल्या तक्रारीत असे नमुद केले होते की पूर्णा नगर परिषद प्रशासनाकडून प्रधानमंत्री आवास योजनेचे काम कुशाग्र असोसिएट प्रा.लि.एजेंसीला देण्यात आले संबंधित एजन्सी व नगर परिषद प्रशासनाने संपूर्ण शहरात ९५१ घर मंजूर केली वास्तविक या योजनेत डिपीआरच्या लाभार्थ्यांना लाभ न देता मनमानी पध्दतीने आर्थिक हितसंबंध जोपासत ज्यांना आवश्यकता नाही अश्या लोकांच्या खात्या मध्ये गैरकायदेशीरपने पैसे टाकून प्रधानमंत्री आवास योजनेच्या निधीचा गैरवापर केला आहे.कारण की ज्या लोकांच्या खात्या मध्ये ४० हजार रूपये टाकन्यात आले त्यांची नावे ९५१ डि.पी.आर.(DPR) मध्येच नाही अशी शंका आहे याची जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी चौकशी केल्यास त्या यादी मध्ये ९५१ मंजूर केलेल्या डि.पी.आर.(DPR) मध्ये त्या लोकांचे नाव आहे किंवा नाही हे कळेल.निवेदना असेही नमूद केले आहे की नगर परिषद प्रशासनाकडून संबंधित एजन्सीला लाखों रुपयांची बिल नियमबाह्य देण्यात आलेली असून त्याचीही चौकशी करण्यात यावी व संबंधित कुशाग्र असोसिएट प्रा.लि.नांदेड़ या एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन दोषी आढळल्यास एजन्सीचे लायसंन्स रद्द करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे. 

परभणीचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी शेख इरफ़ान यांच्या तक्रारांची दखल घेऊन मा उपविभागीय अधिकारी गंगाखेड़ यांना चौकशी साठी दि.१९ नोव्हेंबर २०२० रोजी चौकशीचे आदेश दिले त्या नंतर उपविभागीय अधिकारी गंगाखेड़ यांचे पत्र तक्रारदार शेख इरफान यांना दि.१ डिसेंबर २०२० प्राप्त झाले या तक्रारी संदर्भात पहेली बैठक पुर्णा तहसील कार्यालयात दि.२३ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात अली त्या मध्ये तक्रारदार शेख इरफान यांनी पुराव्यानिशी सर्व कागदपत्र तसेच नागरिकांच्या तक्रारी सुध्दा दाखल केल्या त्या नंतर कुशाग्र असोसिएट प्रा.लि.या एजेंसीला व नगर परिषद प्रशासनाला खुलासा करण्यासाठी दि.२७ जानेवारी २०२१ ही तारीख देण्यात आली होती परंतु त्या रोजी मात्र संबंधित  एजन्सीने खोटा डिपीआर नांदेड़ मध्ये तयार करुण त्या खोट्या डिपीआर वर ओएस नंदू चावरे, इंजिनियर संजय दिपके यांच्या स्वाक्षरी घेऊन २७ जानेवारी २०२१ रोजी दाखल करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. 

त्यानंतर पुन्हा तक्रारदारास खुलासा करण्यासाठी दि,१० फेब्रुवारी २०२१ ही तारीख देण्यात अली त्या मध्ये तक्रारदाराने सर्व पुरावे व २०१८ मध्ये जे डिपीआर मंजूर करण्यात आले होते त्या मधील लाभार्थीचे ऑनलाइन बेनेफिशरी स्टेटस प्रिंट देऊन असे सांगितले की ज्या एजेंसी ने दखल केलेले ९५१ चा डिपीआर खोटा आहे त्या मध्ये या लाभार्थी चे नाव का नाही कारण की ते एजेंसी ने दाखल केलेले ९५१ डिपीआर हा खोटा आहे कारण की २०१८ मध्ये जो ९५१ च्या डिपीआर मंजूर करण्यात आला होता त्या मध्ये या लाभार्थीचे नावे आहे आणि जे ९५१ चा डिपीआर मंजूर झाला होता त्यावर तत्कालीन मुख्याधिकारी हेमंत केरुळकर,नगर अभियंता,जूनियर इंजिनियर यांच्या स्वाक्षरी असला पाहिजे तसेच म्हाडा कार्यालय मुम्बईचा सही व शिक्का असला पाहिजे तो नाही असे तक्रारदाराणे खुलासा केला व सर्व पुरावे सादर केले दि.१० फेब्रुवारी २०२१ पासून एक महीण्याचा कालावधी झाला असतांनाही पुर्णा नगर परिषद प्रशासनासह संबंधित कुशाग्र असोसिएट प्रा.लि.या एजन्सीने देखील अद्याप पर्यंत खुलासा केलेला नाही 

संबंधितांना ३ मार्च २०२१ ही तारीख खुलासा करण्यासाठी देण्यात आली होती मात्र संंबंधित एजंन्सीच्या कर्मचाऱ्याची तब्बेत खराब असल्याचे खोटे कारण सांगून खुलासा देण्याची तारीख वाढवून मागण्यात आली चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून त्यांना पुढील १७ मार्च २०२१ ही तारीख देण्यात आली असली तरी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला असतांना मात्र संबंधित एजन्सी व नगर परिषद प्रशासनाने अद्यापही खुलासा केलेला नाही यावरून असे निदर्शनास येत आहे की पंतप्रधान आवास योजनेतील झालेला भ्रष्टाचार दाबण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक खोटेनाटे कारन सांगून तारीख वाढवून घेतल्या जात आहे मात्र या प्रकरात उपविभागीय अधिकारी यांच्या कडून योग्य चौकशी होत नसल्याचेही तक्रारदाराचे म्हणने असून या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे...    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या