💥परभणी जिल्ह्यातील संचारबंदीत वाढ; ५ एप्रिल २०२१ पर्यंत राहणार संचारबंदी...!


💥जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आदेश जारी💥

परभणी (दि.३१ मार्च) परभणी जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संचारबंदीत वाढ करण्यात आली असून येत्या ५ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली आहे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी यासंदर्भात आज बुधवार दि.३१ मार्च २०२१ रोजी नव्याने आदेश काढले आहेत जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी आज ३१ मार्च रोजी संपणार होती परंतु कोरोनाबाधीतांची संख्या सातत्याने वाढतच असल्याने ५ एप्रिल पर्यंत आता ही संचारबंदी कायम असेल असे या आदेशात म्हटले

💥जिल्ह्यात आता सोमवार पर्यंत संचारबंदी….
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
💥


ः कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखावा म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीच्या कालावधीमध्ये वाढ केली असून सोमवार दि.५ एप्रिल २०२१ पर्यंत सकाळी ६-०० वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी कायम असणार असल्याचे आज बुधवारी दुपारी काढलेल्या आदेशात त्यांनी नमूद केले आहे.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाची ती साखळी तुटावी म्हणून उपाययोजनांचा एक भाग म्हणून गुरुवार दि.१ एप्रिल २०२१ सकाळी ६-०० वाजेपर्यंत यापुर्वी संचारबंदी लागू केली होती. मात्र, रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने संचारबंदी कालावधीत त्यांनी वाढ केली असून ती पाच एप्रिल (सोमवार) सकाळी सहा वाजेपर्यंत असणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ज्या बाबींना, अस्थापनांना, अत्यावश्यक बाबींना या कार्यालयाने सूट दिली आहे, त्या अस्थापना सुरू राहतील, ज्या अस्थापना, दुकान यांना सूट दिली नाही ती बंद राहतील. तसेच यापुर्वी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश, सुधारित आदेश, निर्देश या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील, असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या