💥पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील नदीपात्रात स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती तस्करी विरोधात धाडसी कारवाई...!


💥स्थागुशाच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत अडीच ब्रास रेती टिप्परसह ८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त💥

पुर्णा (दि.३ मार्च) - तालुक्यातील कान्हेगाव येथील नदीपात्रातून गौण-खनिज रेतीचे अवैधरित्या उत्खनन करून या चोरट्या रेतीची तस्करी करण्याच्या तय्यारीत असलेल्या रेती तस्करी विरोधा कारवाई करीत अडीच ब्रास चोरट्या रेतीसह टिप्पर ताब्यात घेण्याची धाडसी कारवाई आज बुधवार दि.३ मार्च २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत पवार,पोलिस उपनिरिक्षक विश्वास खोले पथकातील सहकारी पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ,शंकर गायकवाड,यशवंत वाघमारे,विष्णु भिसे,अजहर पटेल,दीपक मुदिराज, चालक अरूण कांबले यांनी केली.

स्थागुशाच्या पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईत अडीच ब्रास अवैध चोरट्या रेतीने भरलेला टिप्पर क्र.एम.एच.२६ बी.४५३० हे वाहन जप्त केले असून या कारवाईत पथकाने एकंदर ८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या घटने संदर्भात पो.कॉ.दिपक मुदीराज यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात टिप्पर चालक व मालका विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुरनं.८६/२०२१ कलम ३७९,३४ भादवीसह कलम ४८(७)(८) गौण खनिज कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास जमादार अर्जून रणखांब हे करीत आहेत....

फोटो - प्रतिकात्मक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या