💥गंगाखेड तालुक्यातील पडेगाव शिवारात वीज पडून गाईचा मृत्यू....!


💥तलाठी ,मंडळ कृषी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही बाब कळविण्यात आले💥

गंगाखेड ; तालुक्यातील पडेगाव शिवारातील शेतकरी नरहरी सत्‍यभान काळे यांची आखाडया जवळ बांधलेली गाय वीज पडून मृत्यू पावली. रविवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला.

नरहरी काळे यांची गाय पाऊस येण्याचा वातावरण झालेला आहे म्हणून इतर जनावरा सोबतच आखड्याच्या समोर बांधली होती. अचानक जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात कडाडून वीज पडली .यात लाल रंगाची गाय जागीच मृत्युमुखी पडली. सदर शेतकऱ्यांने ही घटना सखाराम बोबडे पडेगावकर यांना भ्रमणध्वनी द्वारे कळवली. बोबडे यांनी शासकीय दरबारी प्रयत्न करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे अभिवचन शेतकऱ्यास दिले .तलाठी ,मंडळ कृषी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही बाब कळविण्यात आली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या