💥हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्याल्या मौजे अनखळी येथे अज्ञात आजाराने ४० कोंबड्यांचा मृत्यू...!


💥शेतातील कुक्कुटपालनातील अज्ञात आजाराने ४० कोंबड्यां दगावल्याची घटना घडली💥

हिंगोली ; जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे अनखळी गावातील शेतकरी प्रभाकर गणेशराव गारकर हे कुक्कुटपालनाचा जोड व्यवसाय करतात त्यांच्या शेतातील कुक्कुटपालनातील अज्ञात आजाराने ४० कोंबड्यां दगावल्याची घटना घडली आहे.


मृत कोंबड्यांची पाहणी करण्याकरिता औंढा नागनाथ तालुक्याचे तहसीलदार कानगुले घटनास्थळी पोहोचून सदरील घटनेची पाहणी केली सदरील कोंबड्यांच्या कोणत्या कारणाने दगावल्या आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने इतर ठिकाणी या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मौजे अनखळी आणि आजुबाजुचा परीसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हिंगोलीने अलर्ट झोन जारी केला आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या