💥परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या निपाणी टाकळी परिसरात महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकला कालव्यात....!


💥हिरव्या रंगाच्या कापडी पोत्यात २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह बांधून फेकण्यात आला💥

परभणी (दि.५ मार्च) - जिल्ह्यातील सेलू तालुक्यातल्या निपाणी टाकळी परिसरात एका महिलेचा निर्घृण हत्या करून तीचा मृतदेह लोअर दुधना कालव्यात फेकल्याची भयंकर घटना आज शुक्रवार दि.५ मार्च २०२१ रोजी उघडकीस आली.

निपाणी टाकळी रस्त्यावरील मुक्तार पठाण नामक शेतकऱ्याच्या शेतामधून गेलेल्या लोअर दुधनाच्या प्रकल्पाच्या कालव्यात हिरव्या रंगाच्या कापडी पोत्यात २५ वर्षीय विवाहितेचा मृतदेह बांधून फेकण्यात आला. महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात फेकला असल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती समजताच सेलू पोलिस स्थानकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला गाडेकर,फौजदार माधव लोकूलवार,कर्मचारी सुधाकर चौर, रामेश्वर मुंडे, पाळू पुरणवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते.

दरम्यान, हा खूनाचा प्रकार असून महिलेची ओळख पटवल्यानंतर पुढील तपासास दिशा मिळेल,अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या