💥औरंगाबादेत कोरोनासुराने केले उग्ररूप धारण; 902 जनांना केले बाधीत,उपचारा दरम्यान 9 कोरोनबाधितांचा मृत्यू.....!


💥जिल्ह्यात 49890 कोरोनामुक्त, 4131 रुग्णांवर उपचार सुरू💥

औरंगाबाद  :  औरंगाबाद शहरात 679 आणि जिल्ह्याभरात 223 अशा आत्तापर्यंतच्या विक्रमी संख्येने आज 11 मार्च 2021 रोजी तब्बल 902 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने संपूर्ण देशभरात नव्या बाधितांच्या संख्येत औरंगाबाद टॉप टेनमध्ये पोहोचले आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या अंशतः लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच विक्रमी संख्या नोंद झाल्याने चिंता अधिक वाढली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात आज 277 जणांना (मनपा 231, ग्रामीण 46) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 49890 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 902 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55341 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1320 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,

💥आज 9 कोरोनबाधितांचा मृत्यू

घाटीत सेलगाव, औरंगाबाद येथील 70 वर्षीय पुरूष, एन -5 सिडकोतील 48 वर्षीय स्त्री, जय हिंद नगर, पिसादेवी येथील 65 वर्षीय पुरूष, सिद्धार्थ गार्डन, मिल कॉर्नर परिसरातील 45 वर्षीय पुरूष, एन -5  सिडकोतील 84 वर्षीय पुरूष, गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथील 64 वर्षीय पुरूष, नक्षत्रवाडीतील 87 वर्षीय पुरूष, बीड बायपास येथील 71 वर्षीय पुरूष, हर्सुल येथील 72 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

💥मनपा (679) :

सिडको (10), प्रगती कॉलनी (1), घाटी परिसर (4), म्हाडा कॉलनी (4), ब्रिजवाडी (1), सुंदरवाडी (1), प्रताप नगर (3), एमआयडीसी (1), फाजीलपुरा (1), कुंभारगल्ली बेगमपुरा (1), नारळीबाग (5), नंदनवन कॉलनी (3), सुदर्शन नगर (1), एमजीएम हॉस्पीटल (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), मयूर पार्क (3), उल्कानगरी (9), भावसिंगपुरा (1), राजेश नगर (5), पैठण रोड (3), स्नेह नगर (3), टिळक नगर (1), समर्थ नगर (3), सत्कर्म नगर (1), छत्रपती नगर (5), नाथ गल्ली (1), पहाडसिंगपुरा (1), छावणी (1), राहत कॉलनी (1), आकाशवाणी परिसर (1), संभाजी कॉलनी (2), एन अकरा (3), बाजीप्रभू नगर (7), नागेश्वरवाडी (1), शिवाजी नगर (2), चाटे स्कूल जवळ (1), देवानगरी (3), हर्सुल (4), सातारा परिसर (15), जान्हवी रेसिडन्सी (1),राधास्वामी कॉलनी (1), एन अकरा, रवी नगर (1), होनाजी नगर (4), रमा नगर (2), एन बारा (1), आयडीबीआय बँक परिसर, शनि मंदिराजवळ (1), विजय नगर (2), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (2), दर्गा रोड परिसर (2), शांतीनिकेतन कॉलनी (1), शहानूरवाडी , दीप नगर (5), क्रांती चौक (5), अलकनंदा कॉम्प्लेक्स (1), सिटी प्राईड (1), चिकलठाणा परिसर (1), बन्सीलाल नगर (4), कार्तिक हॉटेल परिसर (1), एट्रंस हाऊसर कंपनी परिसर (3), श्रेय नगर (3), एन दोन राम नगर (3), कोकणवाडी (1), एन तीन (7), गजानन मंदिर परिसर (2), बीड बायपास (10), एसटी कॉलनी (1), उस्मानपुरा (4), मुकुंदवाडी (8), विवेक नगर (1), एन चार सिडको (6), शिवशक्ती कॉलनी (1), जय भवानी नगर (6), पिसादेवी (3), पुंडलिक नगर (6), सेव्हन हिल इंद्रायणी हॉस्टेल (1), एन दोन, श्रद्धा कॉलनी (1), जटवाडा रोड (3), गणेश नगर, गारखेडा (1), पेशवे नगर (1), हनुमान नगर (5), एन पाच वीर सावरकर नगर (2), आदिती नगर, हर्सुल (1), गजानन नगर, गारखेडा (3), संजय नगर (1), नारेगाव (1), शिवनेरी कॉलनी (2), नाईक नगर (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), सिल्क मिल कॉलनी (1), मुकुंद नगर (2), रोपळेकर हॉस्पीटल परिसर (1), देवळाई चौक (1), इंदिरा नगर (1), गारखेडा परिसर (4), गुलमंडी (1), बजाज नगर (3), आलोक नगर (3), शिवशंकर कॉलनी (2), सिंधी कॉलनी (2), पांडुरंग नगर (1), बीआर कॉलनी (1), न्यू गजानन कॉलनी (1), जवाहर कॉलनी (1), बजाज विहार (3), आरबीएन सो. (1), चेतक घोडा परिसर (1), बालाजी नगर (3), एन सात सिडको (5), जय हिंद नगर (3), एन नऊ (1), पैठण रोड (1), एन सहा, अविष्कार कॉलनी (1), जयसिंगपुरा (1), तापडिया प्राईड, पैठण रोड (1), रामानंद कॉलनी, जालना रोड (2), रंगार गल्ली (1), मिल कॉर्नर (1), कांचनवाडी (7), मोतीकारंजा, मोंढा (1), सन्मित्र कॉलनी (1), नंदिग्राम कॉलनी (1), औरंगपुरा (1), दशमेश नगर (1), जालन नगर (2), सप्तशृंगी नगर (1), कैलास नगर (1), रोकड हनुमान कॉलनी (2), गादिया विहार (9), उदय कॉलनी (1), सिंधू कॉलनी (1), पंचवटी हॉटेल परिसर (4), पवन नगर (1), नवजीवन कॉलनी (1), उदय नगर (1), भूजबळ नगर (1), शहा बाजार (1), कलेक्टर ऑफिस परिसर (1), एन अकरा हडको (1), शिवेश्वर कॉलनी (1), दांगट गल्ली (1), समता नगर (1), ठाकरे नगर (1), सेना नगर (1), एन तेरा हडको (2), पाथरीकर नगर (1), महेश नगर (1), तापडिया नगर (3), जाधववाडी (1), जवाहर कॉलनी (1), सूतगिरणी चौक परिसर (2), नाहद कॉलनी (1), संयोग नगर (1), साराकृती पैठण रोड (1), तक्षशील नगर (1), इटखेडा (4), पद्मपुरा (5), बीएसएनएल ऑफिस परिसर (1), वेदांत नगर (2), जि.प. शासकीय निवासस्थान परिसर (1), खाराकुँवा (1), क्रांती चौक पोलिस स्टेशन परिसर (1), अंबा-अप्सरा टॉकिज परिसर (1), अग्नीशमन केंद्र परिसर, रेल्वे स्टेशन (1), अलंकार सो. (2), काला सो. (1), शिल्प नगर (1), ज्योती नगर (2), महेंद्रकर हॉस्पीटल परिसर (1), सेव्हन हिल, राणा नगर (2), समाधान कॉलनी (1), शेवाळे हॉस्पीटल परिसर (1), नाथ नगर (1), लक्ष्मी नगर (1), हडको (1), एन पाच अरुणोदय कॉलनी (1), बँक कॉलनी, सातारा परिसर (1), कासलीवाल तारांगण, मिटमिटा (1), रघुवीर नगर (1), बेस्ट प्राईड परिसर (1), मातोश्री नगर (1), नक्षत्रवाडी (1), नक्षत्र पार्क (1), शंकर नगर, इटखेडा (1), धूत बंगला परिसर, स्टेशन रोड (1), सुराणा नगर (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (2), कोहिनूर कॉलनी (1), राजेश अपार्टमेंट (1), एन सहा सिडको (1), आयकॉन हॉस्पीटल परिसर (1), पेठे नगर (1), पडेगाव (1), अन्य (279)

ग्रामीण (223) :

गंगापूर (2), कानडगाव (1), वाहेगाव (1), वाळूज (4), बिडकीन (2), खिर्डी, खुलताबाद (2), कन्नड (1), चित्तेपिंपळगाव (1), पाथरी, फुलंब्री (1), वडगाव को (8), बजाज नगर (9), सिडको महानगर एक (3), सिता नगर, साई श्रद्धा पार्क सिडको महानगर एक (1), आंबेलोहळ (2), ज्योती नगर, दौलताबाद (1), चौका (1), विटावा (1), तिसगाव (1), अनय् (181).

💥शहराचा कोरोनाचा रिकव्हरी रेट 88.43  %  

शहरातील  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.  एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. रूग्णवाढ आणि मृत्युदरातही वाढ झालेली असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घटला आहे.  11 मार्च 2021 रोजी हे प्रमाण 88.43  %  एवढे नोंदले गेले. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर हा 11 मार्च रोजी 2.4 % तर जिल्ह्याचा 2.3 % आहे. कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर ही वाढला आहे.  11 मार्च रोजी बाधित होणारांचा दर 9.13 % नोंदला गेला.

 💥सरकारी कार्यालयात अँटीजन चाचणी 6 पॉझिटिव्ह आढळले

आज 11 मार्च 2021  रोजी  शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार व मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख सरकारी कार्यालयात  येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात येत आहे.

मनपा मुख्यालयात 14 जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली.  यात 5 पॉझिटिव्ह आढळून आले.पोलीस आयुक्त कार्यालयात 31 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळुन आले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात 4 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात कोणीही पॉझिटिव्ह आढळुन आले नाही . आरटीओ कार्यालय येथे 5 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली, यात 1 पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.

💥शहरातील 3134 लाभार्थ्यांना लसीकरण

1 मार्च 2021 पासून शासन निर्देशानुसार महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 60 वर्षे वरील जेष्ठ नागरिकांना व इतर आजारी असलेल्या नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात येत आहे . या अनुषंगाने 10 मार्च रोजी 60 वर्षे वरील 1521  लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले . 45 ते 59 वर्षे पर्यन्त चे आजारी असलेल्या 660 लाभार्थी मिळून  एकूण 2,181लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तसेच 323 हेल्थ केअर वर्कर यांना पहिल्या टप्प्याचे व 181 हेल्थ केअर वर्कर्स यांना दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण करण्यात आले . तसेच  329 फ्रंट लाईन वर्कर्स यांना पहिल्या टप्प्याचे व 120 लाभार्थीना दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण करण्यात आले, असे एकूण मिळून 3134 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

💥रेल्वे स्टेशन व  विमानतळ  येथे 163 प्रवाशांची कोरोना चाचणी

औरंगाबाद महानगरपालिके तर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत.याच अनुषंगाने  शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन येथे  रेल्वे प्रवाशांची  कोरोना चाचणी करण्यात येत आहे .   आज 11 मार्च 2021 रोजी एकूण 117 RTPCR  टेस्ट करण्यात आल्या. आज प्राप्त  अहवाल नुसार काल केलेल्या RTPCR  चाचणीत कोणीही  पॉझिटिव्ह आढळून आले नाहीत. औरंगाबाद विमानतळ येथे शासन निर्देशानुसार एकूण  46 विमान प्रवासी यांची RTPCR  कोरोना चाचणी घेण्यात आली. काल केलेल्या RTPCR चाचणीत कोणीही  पॉझिटिव्ह आढळून आले नाही.

शहरात 3,334 नागरिकांच्या चाचण्या

औरंगाबाद शहरात आज 11  मार्च    रोजी मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 3,334 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 705  अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या.  तसेच विविध केंद्रांवर दिवसभरात सायंकाळपर्यंत एकूण 2,629 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या