💥साजापूर-शरणापूर रस्ता चौपदरी करणासाठी 54 कोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली मंजूरी...!


💥आमदार संजय शिरसाट यांच्या प्रयत्नाला यश💥

✍️ मोहन चौकेकर

औरंगाबाद (ता.16) औरंगाबाद शहर व परिसातील रस्ते विकास कामांना गती मिळाली असून ठाकरे सरकारकडून ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडेल त्या  ठिकाणी निधी उपलब्ध करूण दिला जात आहे. साजापूर ते  शरणापूर या पाच  किलोमिटरच्या रस्त्यासाठी आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची  मागणी केली होती.  

मागील महिण्यात मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे  यांनी औरंगाबाद येथे भेट दिली होती. त्यावेळी साजापूर-करोडी-शरणापूर या रस्त्यासाठी निधी कमी पडत असल्याचे आमदार शिरसाट यांनी निदर्शनास आणूण दिले होते.  सार्वजनिक  बांधकाम  विभागाच्या  अधिकार्यांनी या संदर्भातील  सविस्तार प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात मंजूरी दिली. अगोदर पंधरा आणि दुसर्या  टप्प्यात 38 कोटी 67लाख रुपये मंजूर केले आहे. अशा  प्रकार 54 कोटी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे शहर व परिसरातून राष्ट्रीय महामार्ग, समृद्ध़ी मार्ग जात आहे.या बरोबरच महानगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते तयार केले  जात आहे. 

औरंगाबाद पश्चिम  मतदार संघ हा शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विखुरलेला आहे. शहरातील पायाभुत सुविधांवर बहुतांश  कामे  झालेली  आहे. शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते, फुटपाथ, ड्रेनेज लाईन, ओपन जीम, गार्डन,  या सुविधा विकसित झाल्या आहेत. आता ग्रामीण भागातील विकासासाठी आमदार संजय शिरसाट यानी पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर निधी ठाकरे सरकारकडून उपलब्ध करून घेत आहेत. नुकताच पंढरपुर, नक्षत्रवाडी, रस्त्याच्या रूंदीकरण व मजबूतीकरण करण्यात येणार आहे वडगाव रस्ता ते  सैलाणीबाबा चौकापर्यंत चारपदरी सिमेंट  काँक्रेट करण्यात येणार आहे एकोड-पाचोड,  भालगाव-शेंद्रा, सिंदोन-भिंदोन या मार्गावरील पुलांचे बांधकाल केले जाणार आहे...

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या