💥भारतात 40906 तर महाराष्ट्र राज्यात 25681 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ....!


💥महाराष्ट्रात सर्वाधिक 25681 रुग्णांची वाढ💥

नवी दिल्‍ली देशातील काही राज्यांमध्ये नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन मोठी वाढ होण्याचा कल कायम आहे. नव्या रुग्णांपैकी रुग्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक,गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील आहेत. गेल्या 24 तासांत 40, 906 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.देशभरात गेल्या 24 तासांत 188 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 70 मृत्यू नोंद झाली आहे.  देशभरात नव्या प्रतिदिन नोंदल्या गेलेल्या रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 25,681 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पंजाबमध्ये 2,470 आणि केरळमध्ये 1984 , गुजरात मध्ये 1415 , तामिळनाडू मध्ये 1087 , कर्नाटक ध्ये 1587, मध्यप्रदेश मध्ये 1140 , छत्तीसगडमध्ये 1097 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

भारतात आतापर्यंत एकूण कोविड मुक्त झालेल्यांची संख्या आज रोजी 1,11,05,149 आहे  .  सक्रीय कोविड रुग्ण 2,85,449 सध्या देशात आहेत . गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांमधून मुक्त  23,623 रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरातील एकूण कोविड सक्रीय रुग्णांपैकी 76.48% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये आहेत. 

💥महाराष्ट्रात सर्वाधिक 25681 रुग्णांची वाढ💥

महाराष्ट्रात आज 25,681 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 14,400 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 21,89,965 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 1,77,560 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.42% झाले आहे. तर महाराष्ट्रात दिवसभरात 70 जणांचा मृत्यू झाला.

देशातील आठ राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड रुग्णांच्या संख्येचा आलेख सतत चढता राहिला आहे.  केंद्र सरकार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विशेषतः जिथे दैनंदिन रुग्ण संख्येत निरंतर वाढ निदर्शनाला येत आहे त्यांच्याशी सक्रीय समन्वय साधत आहे. केंद्र सरकार त्यांच्याबरोबर कोविड नियंत्रणाची स्थिती व सार्वजनिक आरोग्याच्या उपायांचा नियमितपणे आढावा घेत आहे.

महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये अलीकडे वाढत असलेली कोविडच्या रुग्णाची संख्या लक्षात घेता कोविड-19 नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपायांना सहाय्य करण्यासाठी केंद्राने महाराष्ट्र व पंजाब येथे उच्चस्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके नियुक्त केली आहेत. याआधी केंद्र सरकारने कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात राज्यांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर येथे उच्चस्तरीय पथके नियुक्ती केली होती.  पुढील पाठपुरावा कारवाईसाठी केंद्रीय पथकांचे अहवाल राज्यांसमवेत सामायिक केले जातात....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या