💥औरंगाबाद जिल्ह्या मध्ये लॉक डाउन आता 30 नाही तर 31 मार्च पासून...!


💥मंगळवारी पूर्ण दिवस बाजारपेठ सुरू राहणार मंगळवारी रात्री बाराच्या नंतर लॉक डाऊन सुरू होणार💥

💥सुधारित आदेश..✍️ 

औरंगाबाद जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी व पोलीस आयुक्त , औरंगाबाद ( शहर ) यांनी संदर्भ क्र .7 अन्वये दिनांक 27/03/2021 रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 193 ) मधील तरतुदीनुसार संचारबंदी / लॉकडाऊनचे आदेश यापूर्वी निर्गमित केल्यानंतर काही बाबींच्या संदर्भात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अंशतः बदलासह सुधारित आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ( 5 ) मधील प्राप्त अधिकारान्वये खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत .

 💥मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम आहेत.✍️

 1. औरंगाबाद जिल्हयाच्या हद्दीपावेतो बुधवार दिनांक 31.03.2021 चे 00.01 वाजेपासून ते शुक्रवार दिनांक 09.04.2021 चे 24.00 वाजेपर्यंत. संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत .

2. मंगळवार दिनांक 30.03.2021 रोजी सर्व आस्थापना / कार्यालये सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील . 2 राष्ट्रीय / राज्य / विद्यापीठ / शासन / शिक्षणमंडळ  बँक इ . स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षांसाठी , परीक्षार्थीना आवागमनासाठी सूट देण्यात येत आहे . परीक्षार्थीनी संबंधित परीक्षेचे प्रवेशपत्र ( Hall ticket ) सोबत बाळगणे अनिवार्य राहिल . 

3. पेट्रोलपंप सर्व नागरिकांसाठी सकाळी 08.00 ते दुपारी 12.00 या वेळेत खुले राहतील, नागरिकांनी अत्यावश्यक बाब असेल तरच पेट्रोल पंपावर जावे व गर्दी टाळावी अशी प्रशासनाची अपेक्षा आहे . दुपारी 1200 वाजेनंतर पेट्रोलपंप धारक यांनी फक्त अत्यावश्यक सेवेमधील व ज्यांना संचारबंदीमधून सूट दिलेली आहे त्यांना इंधन पुरवठा करतील . 

4. औरंगाबाद जिल्हयातील होम आयसोलेशन मधील Covid - 19 रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हॉटेल्सला होम डिलीव्हरी साठी रात्री 8.00 वाजेपर्यंत अनुमती राहिल , सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती , संस्था अथवा समूह यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात .

➡️सदरील आदेश दिनांक 29/03/2021 रोजी संयुक्त स्वाक्षरीनिशी निर्गमीत करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या