💥सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात आज 15 मार्चपासून बँकांचा 2 दिवसांचा संप....!


💥भारतीय स्टेट बँकेसह अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं कामकाज राहणार ठप्प💥 

 ✍️ मोहन चौकेकर

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) च्या बॅनरखाली 9 संघटनांनी सोमवार, 15 मार्चपासून दोन दिवसांच्या बँक संपाची हाक दिली आहे.दोन सरकारी बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात संघटनांनी हा संप पुकारला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA) सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी दावा केला की, सुमारे 10 लाख कर्मचारी आणि बँक अधिकारी या संपात सहभागी होतील 15 आणि 16 मार्च रोजी हा संप असणार असून अनेक बँकांचे कामकाज या कालावधीत ठप्प असणार आहे.

💥दोन दिवशीय संपात 'या' संघटना होणार सहभागी -

यूएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (All India Bank Employees Association-AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फेडरेशन (All India Bank Officers Confederation -AIBOC), नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (National Confederation of Bank Employees -NCBE), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन All India Bank Officers Association -AIBOA) आणि एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (Bank Employees Confederation of India -BEFI) यांचा समावेश आहे.

याशिवाय INBEF, INBOC, NOBW आणि NOBO या संघटनांचादेखील या संपामध्ये समावेश असणार आहे.  

✍️  मोहन  चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या