💥औरंगाबाद जिल्ह्यात काल शुक्रवारी नव्याने आढळले 1251 कोरोनाबाधीत रुग्ण...!


💥जिल्ह्यात 53498 कोरोनामुक्त, 9357 रुग्णांवर उपचार सुरू💥

औरंगाबाद  :  औरंगाबाद शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक आज 19 मार्च 2021 रोजी काहीसा कमी झाला. शुक्रवारी 19 मार्च रोजी जिल्ह्यात 1251 नव्या बाधितांची नोंद झाली तर दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झाला. गेल्या सतत 5 दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची सलग विक्रमी वाढ होत होती. 14 मार्च ते 18 मार्च या पाच दिवसांच्या कालावधीतच जिल्ह्यात एकूण 6314 नवीन रुग्णांची वाढ झाली. काल 18 मार्च 2021 रोजी आत्तापर्यंतची एका दिवसातील 1557 ही नवीन विक्रमी रुग्णवाढ संख्या नोंदली गेली .

औरंगाबाद जिल्ह्यात आज 19 मार्च 2021 रोजी 459 जणांना (मनपा 380, ग्रामीण 79) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 53498 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1251 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64243 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1388 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 9357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

मनपा (1062)

समर्थ नगर (8), पांडुरंग नगर (1), बीड बायपास (17), भवानी नगर  (2), भूषण नगर (1), मयुर पार्क (9), एन-4 (6), एन-7 (7), सिविल हॉस्पीटल (3), एन-2 (17), सुरेवाडी (3), प्रकाश नगर (2), एन-6 (17), एचडब्लुपीटी (1), एचएफडब्लुपीटीसी (1),  एन-9 (9), जय भवानी नगर (10), काल्डा कॉर्नर (1), बन्सीलाल नगर (5), कांचनवाडी (4), ज्योतीनगर (8) पद्मपूरा (6), मिलकॉर्नर (1), कैसर कॉलनी (1), शिवाजी नगर (7), औरंगाबाद (19), स्नेह नगर (1), नक्षत्रवाडी (2), उल्का नगरी (10), चेतना नगर (3), गारखेडा परिसर (18), उस्मानपूरा (7), हडको (3), सिडको (5), हर्सूल (4), रायगड नगर (1), एन-5 (13), जाधववाडी (3), पन्नालाल नगर (3), मुकुंदवाडी (15), संदेश नगर (1), विशाल नगर (8), कैलास नगर (2), दर्गा रोड (1), शंभुनगर (1), पुंडलिक नगर (14), एन-8 (9), शास्त्री नगर (1), मोंढा नाका (2), एन-11 (4), खोकडपूरा (1), हनुमान नगर (4),  चिकलठाणा (2), ब्रिजवाडी (2), जालान नगर (5), राहुल नगर (1), अविष्कार कॉलनी (1), रामनगर (3), नारळीबाग (2), पिसादेवी रोड हर्सूल (1), फाजलपूरा (2), ईटखेडा (3),  बळीराम पाटील शाळा (2), छावणी (2), पडेगाव (4), एचसीईएस (1), नंदनवन कॉलनी (1), पीईएस कॉलेज (7), मिलिंद हायस्कुल (2), शांतीपूरा (1), रोझा बाग (1), अंबिका नगर (1), राम नगर (2), देवळाई (2), छत्रपती नगर (3), विठ्ठल नगर (4), न्यु हनुमान मंदिर (1), एन-1 (2), मातोश्री कॉलनी (1), उत्तरा नगरी (5), बालाजी नगर (2), विवेक नगर (1), विजय नगर (2), एन-3 (2), भोईवाडा (1), आदित्य नगर (1), सातारा परिसर (5), विमानतळ (1), उद्योग निर्मल कमल (1), देवगिरी कॉलनी (1), न्यु हनुमान नगर (2), टी.व्ही.सेंटर (1), स्वांतत्र्य सैनिक कॉलनी (2), देवानगरी (6), एमपी लॉ कॉलेज (1), नागेश्वरवाडी (3), भावसिंगपूरा (2), अनंत भालेराव विद्या मंदिर (1), रोकडिया हनुमान कॉलनी (1), जाधवमंडी (1), आ.कृ.वाघमारे शाळा (1), इंदिराबाई पाठक महाविद्यालय (3), समाधान कॉलनी (1), गर्व्हमेंट कॉलेज ऑफ फार्मसी (3), आयडीबीआय बँक (1), सिल्कमिल कॉलनी (2), देवगिरी कॉलेज (1), तापडिया नगर (5), साकार सृष्टी (1), शिवशंकर कॉलनी (2), पानदरीबा (1), टाऊन सेंटर सिडको (1), बायजीपूरा (1), न्यायनगर (2), मेहेर नगर (5), भानुदास नगर (1), मुथियान नगर (1), अलोक नगर (1), जवाहर कॉलनी (3), म्हाडा कॉलनी (1), श्रेय नगर (2), भारत नगर (1), टिळक नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), गजानन नगर (2), नाथ नगर (2), विद्या नगर (1), बापट नगर (1), मोटेश्वर सोसायटी (2), राजनगर (2),  त्रिपाठी पार्क (1), नविन मिसारवाडी (1), मिलकॉर्नर (1), अजब नगर (1), जटवाडा रोड (2), औरंगाबाद महानगर पालिका (1), वसंत दादा पाटील हायस्कुल (1), कृषी अधिकारी कार्यालय (1), काबरापूरा (1), रेल्वेस्टेशन (1), रशीदपूरा (1), अलंकार सोसायटी (1), संभाजी कॉलनी सिडको (1), संकल्प नगर (1), होनाजी नगर (2), जिजामाता विद्यालय (1), पवन नगर (2), श्रीकृष्ण नगर (3), मयुर नगर (1), नवजीवन कॉलनी (1), टी पाँईट (2), शांतिनिकेतन कॉलनी (1), व्यंकटेश नगर (1), घाटी (1), मोतीवाला नगर (1), कटकट गेट (1), बेगमपूरा (1),खाराकुंआ (2), कर्णपूरा (1), जय विश्वभारती कॉलनी (1), रेल्वे स्टेशन (1), आकाशवाणी (1), प्रताप नगर (4), सूर्यदीप नगर (2), शहानूरमियॉ दर्गा (3), निलकंठ प्लाझा स्टेशन रोड (1), शहानूरवाडी (4), रचनाकार कॉलनी (2), राजा बाजार (1), म्हाडा कॉलनी वेदांत नगर (1), शहानगर (1), शरद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), म्हाडा कॉलनी (1), गोळेगावकर कॉलनी (1), गरम पाणी (1), समाधान कॉलनी (1), मामा चौक (1), राजीव गांधी नगर (1), सिंहगड कॉलनी (2), अन्य (539).

ग्रामीण (189) :

लासूर स्टेशन (1), हर्सूल सावंगी (1), कन्नड (5), चिंचोली (1), रांजणगाव (5), वाळूज (2), शेंद्रा एमआयडीसी (1), शहापूर बाजार (1), पिसादेवी (6), माळीपूरा (1), सुलीभंजन (1), गंगापूर (1), बजाजनगर (17), हर्सूल गाव (6), गोलटगाव (1), तडेगाव (1), सारा वैभव हर्सूल (1), एन-12 (1), देवगिरी व्हॅली मिटमिटा (1), सिडको महानगर (6), वडगाव कोल्हाटी (7), साजापूर (1), अन्य (121).  

मृत्यू (05) :

घाटी-

  1. स्त्री / वय-50/पत्ता – टी.व्ही.सेंटर, औरंगाबाद.
  2. पुरूष/वय-42/पत्ता – नेवपूर, कन्नड, जि.औरंगाबाद.
  3. पुरूष/वय-25/पत्ता – खोकडपूरा, औरंगाबाद.
  4. स्त्री/वय-65/पत्ता – सिध्दार्थ नगर औरंगाबाद.

खाजगी रुग्णालय – 01

5 पुरुष/ 58 / पत्ता- बसये नगर, औरंगाबाद

शहराचा एकूण चाचण्यात कोरोना बाधित होणारांचा दर 27.06  %

शहरातील  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.  एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. रूग्णवाढ आणि मृत्युदरातही वाढ झालेली असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घटला आहे.  19  मार्च 2021 रोजी हे प्रमाण 81.39  %  एवढे नोंदले गेले. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर हा 19 मार्च रोजी 2.17 % तर जिल्ह्याचा 2.30 % आहे. कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर ही वाढला आहे.  आज 19 मार्च रोजी एकूण चाचण्यामध्ये बाधित होणारांचा दर 27.06  % नोंदला गेला.

रेल्वे स्टेशन व  विमानतळ  येथे 159 प्रवाशांची चाचणी  : 6  पॉझिटिव्ह

औरंगाबाद महानगरपालिके तर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने  शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन येथे  रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे . आज  19  मार्च 2021 रोजी एकूण 132 RTPCR  टेस्ट करण्यात आल्या. आज प्राप्त  अहवाल नुसार काल केलेल्या RTPCR  चाचणीत 4 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तसेच आज 19 मार्च  2021 रोजी औरंगाबाद विमानतळ येथे शासन निर्देशानुसार एकूण 27 विमान प्रवाशांची RTPCR  कोरोना चाचणी घेण्यात आली. काल केलेल्या RTPCR चाचणीत 2 पॉझिटिव्ह आढळले आहेत.

522 चाचण्यात 50 व्यापारी पॉझिटिव्ह आढळले

आज 19 मार्च रोजी  महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने 6 मोबाईल पथक व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकार्याने शहरात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापारी बंधूंची  विविध 6 ठिकाणी कोरोना चाचणी घेण्यात आली .

यात फाईन होंडा- 119 (7 पॉझि.), सूतगिरणी चौक  – 66 (4 पॉझि.), जाफर गेट – 74 (15 पॉझि.), आविष्कार कॉलनी – 124(3 पॉझि.), आकाशवाणी- 125(15 पॉझि.), न्युरो हॉस्पिटल 25- (6 पॉझि.) अशा एकूण 522  कोरोना चाचण्या घेण्यात आल्या . चाचण्यात 50 व्यापारी पॉझिटिव्ह आढळले.

सरकारी कार्यालयात 25 पॉझिटिव्ह आढळले

आज 19 मार्च  रोजी  शहरातील प्रमुख 5 सरकारी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांची अँटीजन कोरोना चाचणी घेण्यात आली. यात मनपा मुख्यालयात 41 जणांची अँटीजन चाचणी घेण्यात आली .यात  6 पॉझिटिव्ह आढळून आले. पोलीस आयुक्त कार्यालयात 15 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात 1  पॉझिटिव्ह आढळला . जिल्हाधिकारी कार्यालयात  45 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात 1  पॉझिटिव्ह आढळला .  विभागीय आयुक्त कार्यालयात 67 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . यात  2 पॉझिटिव्ह आढळून आले. आरटीओ कार्यालयात 70 जणांची  कोरोना चाचणी घेण्यात आली . यात   15 पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले.

शहरात 4018 नागरिकांच्या चाचण्या !

औरंगाबाद शहरात आज 19  मार्च    रोजी मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 4018 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 1596  अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात  382   पॉझिटिव्ह आढळून आले.  विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 5  पॉझिटिव्ह आढळून आले.  आज दिवसभरात एकूण 2422 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या