💥रिसोड येथे बेकायदा वाळू वाहतुक करणारे 11 हायवा ट्रक जप्त; वाळू माफियांचे धाबे दणाणले...!


💥स्थानिक गुन्हे शाखेची वाळू माफियांच्या विरोधात धाडसी कारवाई💥

✍️फुलचंद भगत

वाशिम (दि.९ मार्च) :- रिसोड परिसरातून अवैध वाळूची वाहतुक होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असुन स्वत: स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविली असल्याचे एपीआय,अतुल मोहणकर यांनी म्हटले आहे.अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारे 11 हायवा  ट्रक मंगळवारी सकाळी दहाच्या वाजता  दरम्यान रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील भर जहागिर नजिक आसरामाता मंदिर परीसरामध्ये हे हायवा ट्रक रिसोड शहरातून वाळू घेऊन वाशिम आदी दिशेने जात असतांना एल सी बी पथक त्यांच्या निदर्शनास आले एपीआय मोहणकर त्यांनी वाहनचालकांच्या साह्याने ट्रकचालकास थांबवुन रॉयल्टी व इतर कागदपत्रांची मागणी केली.संभदित ट्रकचालकाने कागदपत्रे न दाखवल्याने त्यांनी वाळूचा ट्रक जप्‍त करून रिसोड पोलिस ठाण्यात 11 ट्रक उभे केले .

 तसेच केलेल्या कारवाईची माहिती  उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ए.एन शेलार यांना देऊन ट्रकचालक व मालकावर कायदेशीर कारवाई करून  अहवाल वरीष्ठ यांना सादर करण्याचे सुचना पर निर्देश दिले. याकामी कार्यवाही पथकामध्ये वाशिम गुन्हे शाखेचे अधिकारी शिवाजी ठाकरे एपीआय अतुल मोहणकर, प्रशांत राजगुरू भगवान, गावंडे नारायण जाधव बाळु कंकाळ मुकेश भगवान अमोल इंगोले, राजेश गीरी ,राम नागुलकर, अश्विन जाधव, किशोर खंदारे, रमेश थोरले, निलेश थोरवे असल्याची माहिती राजेश गीरी यांनी दिली आहे.


प्रतिनीधी-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशीम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या