💥औरंगाबाद जिल्ह्यात काल रविवारी कोरोना स्फोट; विक्रमी 1023 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले...!


💥जिल्ह्यात 51381 कोरोनामुक्त 4981 रुग्णांवर उपचार सुरू💥

औरंगाबाद  :  औरंगाबाद शहरात 793 आणि जिल्ह्याभरात 230 अशा आत्तापर्यंतच्या विक्रमी संख्येने आज 14 मार्च 2021 रोजी तब्बल 1023 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.   11 मार्च 2021 रोजीच औरंगाबाद जिल्ह्यात 902 नव्या बाधितांची संख्या नोंदली गेली होती. त्यानंतर 3 दिवसांनीच हा विक्रम मोडीत तब्बल 1023 नव्या बाधितांची संख्या रविवारी 14 मार्च 2021 रोजी नोंदल्या गेल्याने काळजी वाढली आहे.   कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने 11 मार्चपासून   लॉकडाऊन लागू केले आहे .    शहर व जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या अंशतः लॉकडाऊनच्या 2 दिवसांत विक्रमी संख्या नोंद झाल्याने चिंता अधिक वाढली आहे.   औरंगाबाद जिल्ह्यात आज 364 जणांना (मनपा 309, ग्रामीण 55 ) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत  51381  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  1023 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 57701 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1339 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

4 एप्रिल पर्यंत शहरातील सर्व कोचिंग क्लासेस बंद राहणार

शहरातील वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भाव च्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने मा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार शहरातील सुरू असलेले सर्व कोचिंग क्लासेस दि 4 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात 10 व 12 वी च्या क्लासेस चा सुद्धा समावेश राहणार आहे. शाळा आणि कॉलेजमधून 10 वी व 12 वीचे वर्ग सुरु आहेत. ते देखील बंद राहणार आहेत असे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी कळविले आहे.

रेल्वे स्टेशन व  विमानतळ  येथे 190 प्रवाशांची चाचणी  : 3  पॉझिटिव्ह  आढळले

औरंगाबाद महानगरपालिके तर्फे कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहे .याच अनुषंगाने  शासन निर्देशानुसार रेल्वे स्टेशन येथे  रेल्वे प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे . आज 14 मार्च 2021 रोजी एकूण 190 RTPCR  टेस्ट करण्यात आल्या. आज प्राप्त  अहवाल नुसार काल केलेल्या RTPCR  चाचणीत 3 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  तसेच   आज 14 मार्च  2021 रोजी औरंगाबाद विमानतळ येथे शासन निर्देशानुसार एकूण  47 विमान प्रवाशांची  RTPCR  कोरोना चाचणी घेण्यात आली. काल केलेल्या RTPCR चाचणीत कोणीही   पॉझिटिव्ह आढळून आले नाही.

शहरात 3186 नागरिकांच्या चाचण्या !

औरंगाबाद शहरात आज 14  मार्च    रोजी मनपा आणि विविध केंद्रांवर एकूण 3186 नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये महापालिकेच्या वतीने 494  अँटीजन चाचण्या घेण्यात आल्या. यात 200  पॉझिटिव्ह आढळून आले.  विविध केंद्रांवर अँटीजन चाचण्यात 4  पॉझिटिव्ह आढळून आले.  आज दिवसभरात एकूण 3180 जणांचे स्वॅब तपासण्याठी घेण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहराचा कोरोनाचा रिकव्हरी रेट 87.54  % 

शहरातील  कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.  एकिकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असतांनाच दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यु होणारांचे प्रमाणही वाढताना दिसते आहे. रूग्णवाढ आणि मृत्युदरातही वाढ झालेली असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट देखील घटला आहे.  14 मार्च 2021 रोजी हे प्रमाण 87.54  %  एवढे नोंदले गेले. शहराचा कोरोनाचा मृत्यु दर हा 14 मार्च रोजी 2.3 % तर जिल्ह्याचा 2.3 % आहे. कोरोनाचा शहराचा बाधित होणारांचा दर ही वाढला आहे.  आज 14 मार्च रोजी एकूण चाचण्यामध्ये बाधित होणारांचा दर 21.71  % नोंदला गेला.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

मनपा : (793)

नारळीबाग ( 1), घाटी (3), श्रेय नगर (8), जिल्हा रुग्णालय (1), उत्तरानगरी (2), बजरंग चौक (4), म्हाडा कॉलनी (11), बीड बायपास (21), गारखेडा (6), तापडिया नगर (2), एन 1 (4), एन 2 (7), एन 3 (3),  एन 4 (4), एन 5 सिडको (6), एन 6 (11), एन 7 (5), एन 8 (6), एन 9 (5), एन 11 (6),  एन 12 (8),  सेव्हन हिल (2), टाऊन सेंटर (2), विद्यानगर (3), राजेश नगर बीड बायपास (1), त्रिमुर्ती चौक (2), शिवाजीनगर (4), एन 11 (4), बायजीपुरा (2),जाधववाडी (11), सफलनगर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), मयुरपार्क (7),  श्रीकृष्ण नगर (1), भाग्यनगर (2), वसंत नगर (1), सुदर्शन नगर (1), सिंधी कॉलनी (2),  व्यंकटेश नगर (2), रामपुरी (1), मेहेर नगर (3), सुराणा नगर (1), कांचनवाडी (6), एमजीएम परिसर (3), रोकडा हनुमान कॉलनी (4), उल्कानगरी (9), एन 1 (1), नक्षत्रवाडी (3), क्रांती नगर (2), सिल्क मिल कॉलनी (2), एकनाथ नगर (1), जयभवानी नगर (1), रविंद्र नगर (1), बन्सीलाल नगर (12), क्रांती चौक (2),  पडेगांव (10), दशमेश नगर (1), स्नेह नगर (1), भगतसिंग नगर (2), ज्योती नगर (6), वंदन नगर (1), समता नगर(3), सातारा परिसर (3), बागला नगर (1), सिडको (2), मिटमिटा (3), प्रताप नगर (7), केसरी बाजार रोड (1), वेदांत कॉलनी (1), तिरुपती हॉटेल (3), समर्थ नगर (4),  देवगिरी कॉलनी (1),  ईटखेडा (5), चाणक्यपुरी (1), जय विष्णू भारती कॉलनी (1), कुंभारवाडा (1), गुलमंडी (3), बालाजी नगर (7), एसटी कॉलनी (2), गांधी  नगर (2), टिव्ही सेंटर (2), शिवशंकर कॉलनी (2),  अरिहंत नगर (1), उत्तम नगर (1), न्यु हनुमान नगर (3), संजय नगर (1), उस्मानपुरा (6), माजी सैनिक कॉलनी (1), पुंडलिक नगर (3), माया नगर (1), नारेगाव (6), न्याय नगर (3), आयोध्या नगर (2), जयभवानी नगर (8), चिकलठाणा (8), संभाजी कॉलनी (1), जवाहर कॉलनी (4), मुकुंदवाडी (14), रामनगर (9), वानखेडे नगर (1), अंबिका नगर हर्सुल (3), प्रकाश नगर (1), लघुवेतन कॉलनी (2), विवेकानंद नगर (2), मिलिंद नगर (1), टाऊन सेंटर (3), संजय नगर बायजीपुरा (2), ठाकरे  नगर (6), नैवेद्य हॉटेल (1), प्रकाश नगर (1), विष्णू नगर (1), उच्च न्यायालय परिसर (1), औरंगपुरा (5), राजाबाजार (2), एसपीआय हॉस्टेल, हडको (11), हिमायतबाग (4), काबरा नगर, गारखेडा (2), सुधाकर नगर (1), कासलीवाल मार्व्हल (1), श्रीकृष्ण नगर (1), कैलास नगर (4), दर्गा रोड (2), जालान नगर (1), पद्मपुरा (3), नंदनवन कॉलनी (1), गोल्डनसिटी (1), दिशा संस्कृती (3), नारळीबाग (2), पहाडसिंगपुरा (2), दीपनगर (2),  विश्रामबाग कॉलनी (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), नागेश्वरवाडी (2),विद्यानिकेतन कॉलनी (2), मारीया हॉस्पीटल (1), सादात नगर(1), कासलीवाल तारांगण (2), होनाजी नगर (2), पोलिस कॉलनी (2), सराफा कॉलनी (1), दिशा नगरी (1), पांढरी बाग (2), समाधान कॉलनी (1), सन्मित्र कॉलनी (2), निराला बाजार (1), भीम नगर (1), जालना रोड (2),खाराकुवा (1), विजय नगर (1), भारतमाता मंदिर (1), रेणुका नगर (1), चिश्तिया कॉलनी (1), स्वामी समर्थ नगर (1), गादीया विहार (2), वेदांत नगर (1), न्यु गणेश नगर (1), भगत नगर (3), राजे संभाजी कॉलनी (1), संकल्प नगर (1), एकता नगर (1), सुरेवाडी (3), सुराणा नगर (2),टिळक नगर (1), गजानन कॉलनी (5), आकाशवाणी (1), भानुदास नगर (1), शंभु नगर (1),रविंद्र नगर (1), राजनगर (3), खिवंसरा पार्क (1), नाथ नगर (1), विष्णू नगर (1), ज्ञानेश्वर नगर (1), सारंग सोसायटी (1), स्टेशन रोड (3), शहानुरवाडी (1), समता नगर (1), झांबड इस्टेट (1), पैठण गेट (1), छावणी (1), शक्तीनगर (1), न्यु शांती निकेतन कॉलनी (1), मयुरबन कॉलनी (1), मकसुद कॉलनी (1),

अन्य: (204)                                                                      

ग्रामीण (230) :

गंगापूर (2), बजाज नगर (43), आडुळ (1), वरुड काजी (1), फुलंब्री (2), रांजण गांव (1), शेंद्रा एमआयडीसी (3), पिसादेवी (1), मिसारवाडी (3), वाळुज (3), तिसगाव (2), कुंभेफळ (1), सावंगी (1), वडगांव कोल्हाटी (4), सिडको महानगर (8), पंढरपुर (1), वरुड काझी (1), सिल्लोड (1),बिडकीन (1), वाळुज (1),  

अन्य: (149)                                                                    

मृत्यू : (5)

    घाटी

  1. पुरूष- वय 39 – पत्ता- गंगापुर
  2. पुरूष- वय 57 – पत्ता- गारखेडा,औरंगाबाद
  3. स्त्री- वय 65 – पत्ता- कंकवटी नगर, कन्नड
  4. पुरूष – वय 55 – पत्ता- साईनगर,एन 6 , सिडको
  5. पुरूष – वय 71 – पत्ता-  आळंद ता. फुलंब्री

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या